केंद्रीय लोकसेवा आयोग
नागरी सेवा पूर्वपरीक्षा 2023 चा निकाल जाहीर
प्रविष्टि तिथि:
12 JUN 2023 6:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जून 2023
दिनांक 28/05/2023 रोजी झालेल्या नागरी सेवा पूर्वपरीक्षा, 2023 च्या निकालाच्या आधारे, खालील अनुक्रमांक असलेले उमेदवार नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2023 साठी पात्र ठरले आहेत.
या उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती आहे. परीक्षेच्या नियमांनुसार, या सर्व उमेदवारांना नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2023 साठी विस्तृत आवेदन प्रपत्र -I (डीएएफ -I) रूपात पुन्हा अर्ज करावा लागेल. डीएएफ- I भरण्यासाठीच्या तारखा आणि महत्त्वाच्या सूचना आणि तो पाठवण्यासंदर्भातली माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर योग्य वेळी जाहीर केली जाईल.
उमेदवारांना असेही सूचित केले जाते की, नागरी सेवा परीक्षा, 2023 ची संपूर्ण प्रक्रिया समाप्त झाल्यावर म्हणजे अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर, मग .नागरी सेवा पूर्वपरीक्षा, 2023 चे गुण, कट ऑफ मार्क्स आणि उत्तर विवरणी आयोगाच्या संकेतस्थळावर https://upsc.gov.in अपलोड केले जातील.
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे धौलपूर हाऊस, शाहजहान रोड, नवी दिल्ली येथे परीक्षा हॉल भवनजवळ एक सुविधा केंद्र आहे. उमेदवार वरील परीक्षेच्या निकालाबाबत कोणतीही माहिती/स्पष्टीकरण यासाठी वैयक्तिकरित्या किंवा दूरध्वनी क्रमांक 011-23385271, 011-23098543 किंवा 011-23381125 सर्व कामकाजाच्या दिवसात सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.00 या वेळेत संपर्क साधू शकतात.
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा:
S.Bedekar/S.Kakade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1931748)
आगंतुक पटल : 244