विशेष सेवा आणि लेख
azadi ka amrit mahotsav

जी - 20 सदस्य देशांच्या सर्वोच्च लेखापरीक्षण संस्थांची शिखर परिषद उद्यापासून गोव्यात सुरू


भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक आणि जी-20 सर्वोच्च लेखापरीक्षण संस्थेचे अध्यक्ष  गिरीश चंद्र मुर्मू  यांचे परिषदेत उद्घाटनपर भाषण होणार

प्रविष्टि तिथि: 11 JUN 2023 5:35PM by PIB Mumbai

 

भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (C&AG) हे भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात होत असलेल्या सर्वोच्च लेखापरीक्षा संस्था-20 (SAI20) प्रतिबद्धता गटाचे अध्यक्ष आहेत. सर्वोच्च  लेखापरीक्षण संस्था शिखर परिषद- 20 शिखर परिषद 12 ते 14 जून 2023 या कालावधीत गोव्यात होणार आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक गिरीश चंद्र मुर्मू 12 जून 2023 रोजी उद्घाटनपर भाषण देतील.

जी 20 देशांचे सर्वोच्च  लेखापरीक्षण संस्था 20 सदस्य, आमंत्रित सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था, आमंत्रित सर्वोच्च  लेखापरीक्षण संस्था, आंतरराष्ट्रीय संस्था, प्रतिबद्धता गट आणि इतर निमंत्रितांचे प्रतिनिधी या शिखर परिषदेला उपस्थित राहतील. ऑस्ट्रेलिया, ब्राझील, इंडोनेशिया, कोरिया, रशिया, सौदी अरेबिया, तुर्किये, बांगलादेश, इजिप्त, मॉरिशस, नायजेरिया, ओमान, स्पेन, संयुक्त अरब अमिराती, मोरोक्को आणि पोलंडच्या सर्वोच्च  लेखापरीक्षण संस्था देखील  सहभागी होणार आहेत.

भारताच्या जी 20 अध्यक्षपदासाठीचे मार्गदर्शक तत्त्व, 'वसुधैव कुटुंबकम' म्हणजेच एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य यानुसार भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांनी सर्वोच्च  लेखापरीक्षण संस्था 20 प्रतिबद्धता गटाच्या दोन प्राधान्य क्षेत्रांवर सहकार्याचा प्रस्ताव मांडला होता. ती दोन क्षेत्रे म्हणजे- नील अर्थव्यवस्था आणि जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता (AI).  

आपल्या परिसंस्थेच्या आरोग्याचे जतन करताना, आर्थिक विकासासाठी सागरी संसाधनांचा शाश्वत वापरउपजीविकेची सुधारित साधने आणि रोजगार उपलब्ध करणे म्हणजे नील अर्थव्यवस्था. प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिकाधिक वापर वाढल्याने सर्वोच्च लेखापरीक्षण संस्थांनी (एसएआय) अनिवार्यपणे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रशासन  प्रणालीचे लेखापरीक्षण करण्यासाठी स्वतःला तयार केले पाहिजे. त्याचबरोबर सर्वोच्च लेखापरीक्षण संस्थांनी त्यांची परिणामकारकता  वाढवण्यासाठी त्यांच्या लेखापरीक्षण  तंत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब करण्याच्या संधी शोधल्या पाहिजेत.

या अनुषंगाने,एसएआय 20 शिखर परिषदेदरम्याननील अर्थव्यवस्था आणि जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्तेवरील माहिती संकलन एसएआय इंडिया सादर करेल,याद्वारे एसएआय 20 सदस्य आणि इतर एसएआयच्या माध्यमातून या प्राधान्य क्षेत्रात भविष्यातील लेखापरीक्षण विषयक मार्गदर्शन करण्यासाठी योगदान आणि अनुभव सामायिक केला जाईल. नील अर्थव्यवस्था आणि जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्तेवरील सूक्ष्म दृष्टिकोन प्रदान करतप्रख्यात तज्ज्ञ गटातील सदस्यांद्वारे माहिती  आणि अनुभवांची देवाणघेवाण केली जाईल. महत्त्वाचे म्हणजे, आगामी काळात प्रशासनात उत्तरदायित्व  वाढवणे आणि जागतिक आव्हानांना प्रतिसाद देण्यासाठी सरकारसोबत धोरणात्मक भागीदारी करण्यासाठी एसएआय 20 प्रतिबद्धता गटाची भूमिका आणि जबाबदार्‍यांवर एकमत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल.

***

R.Aghor/S.Mukhedkar/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1931500) आगंतुक पटल : 248
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Urdu , English , हिन्दी , Manipuri , Punjabi