माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रसारमाध्यम सन्मानाची घोषणा
योग संदेशाचा प्रसार करण्यात प्रसारमाध्यमांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी 33 पुरस्कार
देशात आणि परदेशात योगाभ्यासाचा प्रसार करण्यात प्रसारमाध्यमे बजावत असलेल्या भूमिकेचे कौतुक हा सन्मान करतो : अनुराग ठाकूर
आकलन, प्रशंसा आणि अंगिकाराला चालना देण्यामध्ये माध्यमे उत्प्रेरक आहेत: अनुराग ठाकूर
Posted On:
09 JUN 2023 7:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जून 2023
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज द्वितीय वर्षाच्या 'आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रसारमाध्यम सन्मान' पुरस्कारांबाबत घोषणा केली.
आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रसारमाध्यम सन्मान 2023 अंतर्गत, मुद्रित, दूरचित्रवाणी आणि रेडिओ अशा तीन वर्गवारीत बावीस भारतीय भाषा आणि इंग्रजीमध्ये खालीलप्रमाणे तेहतीस पुरस्कार प्रदान केले जातील.
- ''वृत्तपत्रांमध्ये योगाभ्यासाच्या सर्वोत्कृष्ट प्रसिद्धीसाठी'' 22 भारतीय भाषा आणि इंग्रजीमध्ये 11 सन्मान प्रदान केले जातील.
- "इलेक्ट्रॉनिक मीडिया(दूरचित्रवाणी )मधून योगाभ्यासाच्या सर्वोत्तम प्रसिद्धीसाठी 22 भारतीय भाषा आणि इंग्रजीमध्ये 11 सन्मान प्रदान केले जातील.
- "इलेक्ट्रॉनिक मीडिया (रेडिओ) द्वारे योगाभ्यासाच्या सर्वोत्कृष्ट प्रसिद्धीसाठी 22 भारतीय भाषा आणि इंग्रजीमध्ये 11 सन्मान प्रदान केले जातील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे दरवर्षी 21 जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाने जगभरात आरोग्य आणि निरामयतेसाठी लोकचळवळ उभी राहिली, असे वर्ष 2023 च्या पुरस्कारांबाबत घोषणा करताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
सीमा आणि संस्कृतीच्या पलीकडे जाऊन जगभरातील लाखो लोकांना योग आकर्षित करत असल्याचे ते म्हणाले. शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक कल्याणासाठीच्या योगाभ्यासाच्या समग्र दृष्टीकोनाने लक्षणीय स्वारस्य मिळवले असून त्याला वैश्विकता प्राप्त झाली आहे. योगाभ्यासाची परिवर्तनीय क्षमता दर्शविण्यात आणि त्याबाबतची माहिती प्रसारित करण्यात प्रसारमाध्यमांनी घेतलेल्या अथक प्रयत्नांचा या यशात महत्त्वाचा वाटा आहे. याची दखल घेऊन यंदा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दुसऱ्या वर्षासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रसारमाध्यम सन्मान प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे, हे जाहीर करताना आनंद होत आहे, असे ठाकूर यांनी म्हटले आहे.
देश- परदेशात योगविद्येचा प्रसार करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेची या सन्मानाने प्रशंसा केली आहे, असे ठाकूर यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत असताना, योगाभ्यासाची प्राचीन प्रथा आणि तिच्या असंख्य फायद्यांचा प्रचार करण्यासाठी प्रसारमाध्यमांकडे असलेली प्रचंड शक्ती आणि त्यांची जबाबदारी ओळखणे महत्त्वाचे आहे, असे ठाकूर म्हणाले.
या प्रगल्भ प्रथेला समजून घेण्यासाठी, तिचे कौतुक करण्यासाठी आणि तिला आत्मसात करण्यासाठी प्रसारमाध्यमे प्रोत्साहन देत आहेत, असेही ते म्हणाले. सर्व वयोगटातल्या, वेगवेगळी पार्श्वभूमी आणि क्षमता असलेल्या लोकांसाठी योग ही सार्वत्रिक प्रथा म्हणून सादर करण्यात माध्यमे यशस्वी ठरली आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले.
लोकांना सक्षम बनवण्याची भूमिका बजावल्याबद्दल ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांचे आभार मानले. ते म्हणाले, “भारतात आणि जगभरात योगाभ्यासाचा प्रसार करण्यात माध्यमांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. योगाभ्यासात असलेली परिवर्तनाची ताकद जगासमोर आणण्यासाठी माध्यमांनी निरंतर निष्ठेने काम केले आहे. त्यामुळे योगाभ्यासाला आरोग्याची सार्वत्रिक भाषा बनवण्यात माध्यमांनी निःसंशयपणे महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.”
सन्मानाची शिफारस स्वतंत्र ज्युरी करेल. सन्मानामध्ये एक विशेष माध्यम/प्लेक/ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र असेल.
मार्गदर्शक तत्त्वांनुसार मीडिया हाऊसेस 10 जून 2023 ते 25 जून 2023 या कालावधीत तयार केलेल्या आणि प्रकाशित केलेल्या किंवा दृकश्राव्य/दृश्य सामग्रीचे प्रसारण/प्रसारण केलेल्या लेखाच्या संबंधित क्लिपिंगसह विहित नमुन्यात तपशील सादर करणे आवश्यक आहे. प्रवेशिका दाखल करण्याची मुदत 1 जुलै 2023 पर्यंत आहे.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या https://pib.gov.in/indexd.aspx तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या https://mib.gov.in/ या संकेतस्थळांवर या विषयीच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम सन्माना बद्दल
भारत आणि परदेशात योगाभ्यासाचा प्रसार करण्यासाठी माध्यमांची सकारात्मक भूमिका आणि जबाबदारी ओळखून, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जून, 2019 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम सन्मानची (एआयडीएमएस ) स्थापना केली होती. पहिले पुरस्कार 7 जानेवारी 2020 रोजी प्रदान करण्यात आले आणि त्यानंतर कोविड 19 महामारीमुळे विलंब झाला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हे सन्मान पुनरुज्जीवित करण्याचा आणि 2023 मध्ये दुसरी आवृत्ती आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिन 2015 पासून दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय योग दिनाची कल्पना सर्वप्रथम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र आमसभेत (युएनजीए ) त्यांच्या भाषणात मांडली होती.
ही कल्पना मांडताना पंतप्रधान म्हणाले होते :
"योग ही भारताच्या प्राचीन परंपरेची अमूल्य देणगी आहे. मन आणि शरीराच्या; विचार आणि कृतीच्या ; संयम आणि पूर्ततेच्या ; मनुष्य आणि निसर्ग यांच्यातील सौहार्दाला ; आरोग्य आणि कल्याणासाठी एक समग्र दृष्टीकोनाच्या ऐक्याला योगाभ्यास मूर्त रूप देतो . हा केवळ व्यायाम नाही तर योग हा स्वतःशी, जगाशी आणि निसर्गाशी ऐक्याची भावना शोधण्यासाठी आहे. आपली जीवनशैली बदलून आणि चेतना निर्माण करून, योग आरोग्याला मदत करू शकते. आंतरराष्ट्रीय योग दिन स्वीकारण्याच्या दिशेने आपण काम करूया.”
या प्रारंभिक प्रस्तावानंतर, संयुक्त राष्ट्र आमसभेने 14 ऑक्टोबर 2014 रोजी "आंतरराष्ट्रीय योग दिन" या शीर्षकाच्या मसुद्याच्या ठरावावर अनौपचारिक सल्लामसलत केली.भारताच्या शिष्टमंडळाने विचारविनिमय केला होता . 11 डिसेंबर 2014 रोजी, भारताच्या स्थायी प्रतिनिधीने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ठरावाचा मसुदा सादर केला. मसुद्याच्या मजकूराला 177 सदस्य राज्यांकडून व्यापक समर्थन मिळाले ज्यांनी मजकूर प्रायोजित केला, तो मताशिवाय स्वीकारला गेला.या उपक्रमाला बहुतेक जागतिक नेत्यांकडून पाठिंबा मिळाला. एकूण 177 राष्ट्रांनी हा ठराव सह-प्रायोजित केला, जी अशा स्वरूपाच्या , संयुक्त राष्ट्र आमसभेतीळ ठरावासाठी आतापर्यंतची सर्वाधिक सह-प्रायोजकांची संख्या आहे.
* * *
S.Patil/Sonali K/Prajna J/Sonal C/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1931120)
Visitor Counter : 156