रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 च्या उधमपूर-रामबन टप्प्यातील चिनाब नदीवरील 2- पदरी जयस्वाल पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे - नितीन गडकरी

Posted On: 08 JUN 2023 10:40AM by PIB Mumbai

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 च्या उधमपूर-रामबन टप्प्यातील चिनाब नदीवरील 2- पदरी जयस्वाल पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असल्याची माहिती  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. अत्यंत बारकाईने   रचना  करण्यात आलेला हा 118 मीटरचा लांबीचा बॅलन्स्ड कँटिलिव्हर पूल सुमारे 20 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला  आहे, असे गडकरी यांनी ट्विट संदेशांमध्ये म्हटले आहे.

  या पुलाच्या उभारणीमुळे दोन  उद्देश साध्य होतील असे गडकरी यांनी सांगितले. सर्वप्रथम, हा पूल चंदेरकोट ते रामबन टप्प्यातील  वाहतूक कोंडी  कमी करून वाहनांची सुरळीत वाहतूक  सुनिश्चित करेल. दुसरे म्हणजे हा पूल जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग 44 वर लवकरच सुरू होणाऱ्या 'श्री अमरनाथ यात्रे' दरम्यान वाहने आणि यात्रेकरूंची वेगवान  वाहतुक सुलभ करेल, असे ते म्हणाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली जम्मू आणि काश्मीरला अपवादात्मक महामार्ग पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या वचनबद्धतेवर सरकार ठाम आहे, हे गडकरी यांनी अधोरेखित केले. हा परिवर्तनकारी विकास केवळ या प्रदेशाच्या आर्थिक विकासात योगदान देत नाही तर एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून या क्षेत्राचे आकर्षणही वाढवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

***


Sushama K/S. Mukhedkar /CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1930702) Visitor Counter : 169