मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला उद्या केरळ आणि लक्षद्वीपमध्ये सागर परिक्रमा यात्रेचा सातवा टप्पा सुरु करणार
प्रविष्टि तिथि:
07 JUN 2023 9:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जून 2023
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धोत्पादन मंत्री परशोत्तम रुपाला यांनी ‘सागर परिक्रमा’ हा आगळा-वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत ते पूर्वनियोजित सागरी मार्गाने संपूर्ण देशाच्या किनारपट्टी भागाला भेट देऊन, तिथले मच्छीमार, मत्स्यपालक आणि विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधतात. देशाच्या मत्स्यव्यवसाय विभागामध्ये सुधारणा घडवून, मच्छीमार आणि या व्यवसायाशी संबंधित भागधारकांना त्याचा लाभ मिळावा, यासाठी या संवादाच्या माध्यमातून त्यांच्या समस्या आणि सूचना जाणून घेणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. 5 मार्च 2022 रोजी मांडवी, गुजरात येथून "सागर परिक्रमा" उपक्रमाचा पहिला टप्पा सुरु झाला. सागर परिक्रमाच्या सहा टप्प्यांमध्ये आतापर्यंत गुजरात, दमण आणि दीव, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि अंदमान आणि निकोबारच्या किनारी भागांना भेट देण्यात आली. सागर परिक्रमा टप्पा-VII मध्ये केरळच्या किनारपट्टीचा भाग आणि लक्षद्वीपच्या केंद्रशासित प्रदेश प्रशासनाचा समावेश असेल. यावेळी मंगलोर, कासरगोडे, मडक्कारा, पल्लिकारा, चालियम, कन्हंगाडू, कोईकोड, माहे (पुडुचेरी), बेपोर, त्रिचूर, एर्नाकुलम, कोची आणि कावरत्ती, बंगारामंद अगट्टी ही लक्षद्वीप बेटे, इत्यादी ठिकाणांना भेट दिली जाईल.
केरळला 590 किमी.चा समृद्ध समुद्रकिनारा लाभला आहे आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्र राज्याच्या अर्थव्यवस्थेत तसेच इथले मच्छीमार आणि इतर भागधारकांच्या सामाजिक-आर्थिक कल्याणात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
तर, लक्षद्वीपला 4,200 चौ. किमीचा समुद्र, 20,000 चौ. किमीचे प्रादेशिक पाणी, 4,00,000 लाख चौ. किमीचे विशेष आर्थिक क्षेत्र (EEZ) आणि सुमारे 132 किमीची किनारपट्टी लाभली आहे. लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशाभोवतीचा समुद्र हा विशेषत: ट्यूना माशांसारख्या पेलाजिक मत्स्यसंपत्तीने (समूहाने राहणारे मासे) समृद्ध आहे,
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, केरळचे मत्स्यव्यवसाय मंत्री साजी चेरियन, यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागातील वरिष्ठ अधिकारी, लक्षद्वीपचे केंद्रशासित प्रदेश प्रशासन, राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ, भारतीय तटरक्षक दल, भारतीय मत्स्य सर्वेक्षण आणि मच्छिमार प्रतिनिधी, 8 ते 12 जून 2023 दरम्यान केरळ आणि लक्षद्वीपच्या केंद्रशासित प्रदेशात सागर परिक्रमा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1930609)
आगंतुक पटल : 173