पंतप्रधान कार्यालय
देशभरात प्राथमिक कृषी पतसंस्थांना (पॅक्स) प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे (पीएमबीजेके) सुरु करण्याची परवानगी देण्याच्या निर्णयाचे पंतप्रधानांनी केले स्वागत
Posted On:
07 JUN 2023 4:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जून 2023
देशभरातील 2000 प्राथमिक कृषी पतसंस्थांना (पॅक्स) प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे सुरु करण्याची परवानगी देण्याच्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. सर्वांत महागडी औषधे देखील देशभरात कमीत कमी दरात उपलब्ध व्हावीत हे आमच्या सरकारच्या प्राधान्यक्रमांपैकी एक असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
केंद्रीय सहकारमंत्र्यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
सर्वांत महागडी औषधे देखील देशभरात कमीत कमी दरात उपलब्ध व्हावीत हे आमच्या सरकारच्या प्राधान्यक्रमांपैकी एक आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, सहकार क्षेत्रातील हा मोठा उपक्रम ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचे जीवन सुकर करेल.”
S.Tupe/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1930490)
Visitor Counter : 201
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam