पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
हरदीप सिंह पुरी यांनी जम्मूमध्ये ओएनजीसी-अनुदानित यात्री निवासाची पायाभरणी केली
Posted On:
06 JUN 2023 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जून 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून प्रेरणा घेऊन तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी ) लिमिटेडने जम्मू मधील सिध्रा येथे, राष्ट्रीय आपत्ती निवारण केंद्र आणि यात्री निवास बांधण्यासाठी निधी दिला आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंह पुरी आणि जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज 6 जून 2023 रोजी जम्मूमध्ये या केंद्राची पायाभरणी केली.
दरवर्षी लाखो पर्यटक श्रीनगर आणि अमरनाथला भेट देतात. येथे येणाऱ्या पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे बऱ्याच काळापासून, विशेषत: गरजू पर्यटक आणि यात्रेकरूंसाठी निवासी व्यवस्था आणि इतर सुविधा पुरवणे आव्हानात्मक होत आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, ओ एन जी सी ने वित्तसहाय्य पुरवलेल्या या नियोजित यात्री निवासच्या उभारणीमुळे या समस्येचे मोठ्या प्रमाणात निराकरण होईल. एका वर्षात 30,000 पर्यटकांसाठी निवास व्यवस्था उपलब्ध होऊन पर्यटक आणि यात्रेकरूंसाठी मोठी सोय होईल.
ओ एन जी सी आपत्ती व्यवस्थापन केंद्र, पर्यटकांना निवास, स्वच्छता आणि सुरक्षित पिण्याचे पाणी यासारख्या अत्यावश्यक सुविधा पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. याशिवाय महत्त्वाची माहिती वितरीत करण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी हे केंद्र मध्यवर्ती केंद्र म्हणून कार्य करेल.
याव्यतिरिक्त, रहदारी व्यवस्थापन आणि गरजू पर्यटक/यात्रेकरूंसाठी बोर्डिंग आणि निवासाच्या सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित केल्याने येथे भेट देणाऱ्यांना नेहमीच एक उत्कृष्ट पर्यटन किंवा तीर्थक्षेत्राचा अनुभव मिळेल.
शिवाय, या ओ एन जी सी-निर्मित सुविधांमुळे पर्यटकांच्या संख्येत वृद्धी होऊन अकुशल, अर्ध-कुशल लोकांसह, स्थानिक लोकसंख्येला तसेच कुशल कामगार, कारागीर, रोजंदारी मजूर, रस्त्यावरील विक्रेते आणि विणकर यांनाही त्याचा लाभ होईल.
S.Kane/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1930272)
Visitor Counter : 120