आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या जी 20 अध्यक्षतेखाली आरोग्य कार्यगटाची तिसरी बैठक


भारताच्या जी 20 अध्यक्षतेखालील आरोग्य कार्यगटाची तिसऱ्या बैठकीच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमात " वैद्यकीय प्रतिबंधक उपायांसाठी संशोधन आणि विकासावर जागतिक सहकार्य जाळे बळकट करणे " या विषयावरील कार्यक्रमात केंद्रीय रसायन आणि खते राज्यमंत्री भगवंत खुबा यांचे उद्‌घाटनपर भाषण

Posted On: 05 JUN 2023 9:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 जून 2023

भारताच्या जी 20 अध्यक्षतेखालील  आरोग्य कार्यगट बैठकीच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमात  '' भविष्यातील संभाव्य आरोग्य आणीबाणीवर लक्ष केंद्रित करून  वैद्यकीय प्रतिबंधक उपायांसाठी (एमसीएम ) संशोधन आणि विकासावर  (रोग निदान, लस आणि उपचार)  जागतिक सहकार्य जाळे बळकट करणे" या विषयावरील कार्यक्रमात केंद्रीय रसायन आणि खते राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी उद्घाटनपर भाषण केले. त्यांच्यासोबत या कार्यक्रमात नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल देखील सहभागी  झाले होते.

दर्जेदार, प्रभावी, सुरक्षित आणि किफायतशीर  वैद्यकीय प्रतिबंधक  उपायांच्या  (एमसीएम )  उपलब्धतेवर लक्ष केंद्रित करून औषधनिर्मिती क्षेत्रातील सहकार्य बळकट  करण्यासाठी, भारताच्या जी 20 अध्यक्षतेच्या दुसऱ्या प्राधान्याला  बळकटी देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. लस, उपचार आणि रोगनिदान (व्हीटीडी ) मूल्य साखळीच्या प्रत्येक घटकावर समान लक्ष केंद्रित करण्याचे महत्त्व लक्षात घेऊन, भारताच्या  जी 20 अध्यक्षतेखाली वैद्यकीय प्रतिबंधक  उपाय व्यवस्थेच्या सर्वप्रकारच्या विविध पैलूंमध्ये  समन्वय कसा साधावा यावर चर्चा होत आहे.

या कार्यक्रमाला संबोधित करताना  भगवंत खुबा यांनी विद्यमान आरोग्य व्यवस्था  बळकट करण्याच्या तसेच  भविष्यातील संभाव्य आजारांच्या उद्रेकांना आणि महामारीला तोंड  देण्यासाठी उत्तम  पद्धतीने सज्ज राहण्याच्या गरजेवर भर दिला. "भविष्यात उद्भवणाऱ्या  आरोग्यविषयक आव्हानांवर मात करण्यासाठी  नवनवीन उपाय प्रदान करण्याच्या दृष्टीने  संशोधन आणि विकास सहकार्याचे महत्त्व जगभरातील देशांना जाणवले आहे.", असे त्यांनी सांगितले.

जागतिक संशोधन आणि विकास जाळे हे  भारताच्या ''वसुधैव कुटुंबकम  - एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य'' या जी 20 विचारधारेच्या  तत्त्वांशी संरेखित आहे. आणि सुरक्षित, परिणामकारक, दर्जेदार आणि किफायतशीर  वैद्यकीय प्रतिबंधक उपाय  (व्हीटीडी ) उपलब्ध करण्यासाठी  सहकार्य वाढवणे हे  उद्दिष्ट आहे,यावर केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला.

"भारताने राष्ट्रीय स्तरावर सहयोगात्मक संशोधन आणि विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे", असे सहयोगी संशोधनाच्या दिशेने भारताचे  प्रयत्न अधोरेखित करत ते म्हणाले.

जगाचे औषधालय  म्हणून भारताची ओळख म्हणजे जागतिक स्तरावर चांगले आरोग्य परिणाम घडवून आणण्यात भारताच्या औषध उत्पादन    कंपन्यांच्या महत्त्वाच्या योगदानाची प्रशंसा आहे, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. भारतीय औषध उत्पादन  कंपन्यांनी स्वत:ला, उच्च-दर्जाच्या  औषधांचा विश्वासार्ह आणि किफायतशीर  पुरवठादार म्हणून प्रस्थापित केले आहे, यामुळे  जगभरात सुधारित आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे'', हे त्यांनी अधोरेखित केले.  " जागतिक लस पुरवठ्यापैकी भारत अंदाजे 60% लस पुरवतो, जेनेरिक औषधांच्या  निर्यातीत भारताचा 20-22% वाटा आहे आणि औषध उत्पादनांचा  प्रमुख निर्यातदार म्हणून  200 हून अधिक देशांना भारत  सेवा देतोअसे त्यांनी नमूद केले.

आरोग्यविषयक आव्हानांवर मात करण्यासाठी जागतिक प्रयत्नांना बळ देण्याच्या भारताच्या योगदानावरही त्यांनी प्रकाश टाकला.

"जागतिक संशोधन आणि  विकास  जाळ्याची  स्थापना करताना, आजार , उत्पादन आणि तंत्रज्ञान यांसारख्या परिवर्तनशील  विशिष्ट क्षेत्रांना प्राधान्य देऊन त्यांना यासंदर्भात सज्ज  करणे महत्वाचे आहे".असे, केंद्रीय औषध उत्पादन सचिवांनी सांगितले.

केंद्रीय आरोग्य सचिव  राजेश भूषण यांनी भारताच्या जी 20 अध्यक्षतेखाली प्रस्तावित जागतिक वैद्यकीय प्रतिबंधक उपायांसाठी समन्वय मंचासारख्या  सहयोगी व्यासपीठांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली.

 

 N.Chitale/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1930089)