गृह मंत्रालय
शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीच्या( एसजीपीसी) वरिष्ठ शिष्टमंडळाने केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची नवी दिल्लीत घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
03 JUN 2023 4:31PM by PIB Mumbai
शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीच्या (एसजीपीसी) वरिष्ठ शिष्टमंडळाने आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत भेट घेतली.

शिष्टमंडळाने देशभरातील गुरूद्वारांचे कामकाज आणि एसपीजीसी संबंधी इतर विषयांशी संबधित मुद्यांवर निवेदन दिले. एसजीपीसी मंडळांच्या व्यवस्थापनाअंतर्गत गुरूद्वारांचा समावेश करण्यासंबंधीच्या मुद्याचाही समावेश होता. यामुळे देशभरातील गुरूद्वारांचे व्यवस्थापन सुरळीत चालवता येईल, अशी शिष्टमंडळाची भावना होती. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी या प्रकरणी नेत्यांना सर्व प्रकारचे समर्थन आणि सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
***
N.Chitale/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1929642)
आगंतुक पटल : 192