संरक्षण मंत्रालय

भारतीय नौदल आणि भारतीय सागरी विद्यापीठ यांचे तांत्रिक सहकार्याच्या दिशेने मार्गक्रमण

Posted On: 03 JUN 2023 10:37AM by PIB Mumbai

 

तांत्रिक सहकार्यासाठी भारतीय नौदल आणि भारतीय सागरी विद्यापीठ यांच्यात 02 जून 23 रोजी नवी दिल्ली येथे एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या सामंजस्य करारामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स (मरीन इंजिनीअर), आयएनएस शिवाजी, लोणावळा आणि भारतीय सागरी विद्यापीठ यांच्या चमूद्वारे प्रशिक्षण, संयुक्त संशोधन आणि विकास, सहयोगी अभ्यासक्रम, क्षेत्रीय स्तरावरील समस्यांचे निराकरण या क्षेत्रातील सहकार्याची प्रक्रिया स्पष्ट केली आहे.

या सामंजस्य करारावर चीफ ऑफ मटेरियल व्हाईस ॲडमिरल संदीप नैथानी आणि भारतीय सागरी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मालिनी व्ही शंकर, आयएएस (निवृत्त) यांनी स्वाक्षरी केली.

***

Jaydevi PS/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1929585) Visitor Counter : 152