महिला आणि बालविकास मंत्रालय

गुवाहाटी येथे एनआयपीसीसीडीच्या वतीने पोषण अभियाना अंतर्गत ‘पोषण ट्रॅकर आणि उंची/वजन मापन’ या विषयावर मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन


इंदूर येथे पोषण अभियान 2.0 अंतर्गत सक्षम अंगणवाडी योजनेच्या कार्यकर्त्यांसाठी एडब्ल्यूसी येथे बाल मूल्यमापन धोरणांचे प्रशिक्षण आयोजित

Posted On: 01 JUN 2023 6:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 जून 2023

गुवाहाटी येथे एनआयपीसीसीडीच्या प्रादेशिक केंद्रामध्ये  29-31 मे, 2023 या कालावधीत एकात्मिक बालविकास योजना या एकछत्री योजनेअंतर्गत  अंगणवाडी सेवा योजनेच्या सेविकांसाठी   ‘पोषण ट्रॅकर आणि उंची/वजन मापन’ या विषयावर मार्गदर्शन  प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पोषण  ट्रॅकर हे अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी केंद्राचे उपक्रम  आणि सेवा वितरण पाहण्यासाठी प्रदान केलेले अॅप आहे. ही विकसित प्रणाली सर्व प्रत्यक्ष वेळी अंगणवाडी सेविका , अंगणवाडी केंद्र  आणि लाभार्थ्यांवर देखरेख ठेवण्याचे कार्य करते .

इंदूरमधील  एनआयपीसीसीडीच्या प्रादेशिक केंद्रामध्ये  30-31 मे 2023 या कालावधीत सक्षम अंगणवाडी योजनेच्या सेविकांसाठी  'अंगणवाडी केंद्रांमध्ये बाल मूल्यमापन धोरणे' या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 32 सहभागी कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये :

  1. मूल्यांकन आणि अहवालाची तत्त्वे
  2. माता आणि बाल संरक्षण कार्डचा वापर
  3. जागतिक आरोग्य संघटनेचा तक्ता
  4. बाल मूल्यमापन कार्ड

  

S.Patil/S.Chvan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1929127) Visitor Counter : 120