सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सहकार क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवण योजनेसाठी आंतर-मंत्रालयीन समिती (आयएमसी) च्या स्थापनेला मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार


हा दूरदर्शी निर्णय समृद्ध, आत्मनिर्भर आणि अन्नधान्य समृद्ध भारताचा पाया रचेल, असे शाह यांनी सांगितले.

कृषी साठवण क्षमतेच्या कमतरतेमुळे अन्नधान्याची नासाडी होते आणि शेतकऱ्यांना त्यांची पिके कमी किमतीत विकावी लागतात.

शेतकऱ्यांना आता प्राथमिक कृषी कर्ज संस्थे (पॅक्स) मार्फत त्यांच्या ब्लॉकमध्ये धान्य साठवणुकीची आधुनिक सुविधा आणि त्यामुळे धान्याला रास्त भाव मिळेल

Posted On: 31 MAY 2023 9:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 मे 2023

 

सहकार क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवण योजनेसाठी आंतर-मंत्रालयीन समिती (आयएमसी) च्या स्थापनेला मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

आपल्या ट्वीटमध्ये अमित शहा म्हणाले, " सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवण योजनेसाठी आंतर-मंत्रिमंडळ समिती (आयएमसी) च्या स्थापनेला आणि सक्षमीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो.", असे अमित शहा म्हणाले.

हा दूरदर्शी निर्णय असून त्यामुळे समृद्ध, स्वावलंबी आणि अन्नधान्याने समृद्ध असलेल्या भारताचा पाया रचला जाईल, असे शाह यांनी सांगितले.कृषी उत्पादनांच्या साठवणुकीच्या  क्षमतेच्या अभावामुळे अन्नधान्याची नासाडी होते आणि शेतकऱ्यांकडे अन्नधान्य कमी किमतीत विकण्याशिवाय गत्यंतर रहात नाही, आता या निर्णयामुळे शेतकऱ्यांना प्राथमिक कृषी कर्जसंस्थे (पॅक्स) मार्फत त्यांच्या ब्लॉकमध्ये धान्य साठवणुकीची आधुनिक सुविधा आणि धान्याला रास्त भाव मिळणार आहे.

पॅक्स हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. या योजनेमुळे देशाला अन्न सुरक्षा मिळणार असून सहकाराशी संबंधित कोट्यवधी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ  मिळणार आहे. या योजनेमुळे पॅक्स ला केवळ साठवणूक सुविधाच मिळणार नाही तर फेअर प्राईस शॉप आणि कस्टम हायरिंग सेंटर्स यासारखे उपक्रमही उपलब्ध होणार आहेत

या ऐतिहासिक निर्णयामुळे शेतकऱ्यांना पुढील फायदे मिळणार आहेत.

  1. किमान हमी भावाने (एमएसपी)  काही अग्रिम  रक्कम मिळून शेतकरी त्यांची पिके पॅक्स ला विकू शकतात आणि पॅक्सने बाजारात विक्री केल्यानंतर शिल्लक रक्कम मिळवू शकतात, किंवा
  2. शेतकरी त्यांची पिके पॅक्सचे व्यवस्थापन असलेल्या गोदामांमध्ये साठवू शकतात आणि पुढील पीक चक्रासाठी वित्त सुविधा  मिळवू शकतात आणि त्यांच्या सोयीने पिके विकू शकतात किंवा
  3. शेतकरी संपूर्ण पीक पॅक्सला किमान हमी भावाने विकू शकतात.

 

 

 

* * *

N.Chitale/P.Jambhekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1928830) Visitor Counter : 116