अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्र सरकारचे 2022-2023 या आर्थिक वर्षासाठीचे (तात्पुरते/लेखा परीक्षणाशिवाय) खाते

Posted On: 31 MAY 2023 5:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 मे 2023

 

केंद्र सरकारचे आर्थिक वर्ष 2022-23 साठीचे खाते (तात्पुरते/लेखा परीक्षणाशिवाय) एकत्रित करण्यात आले असून त्याबाबतचा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. ठळक मुद्दे पुढील प्रमाणे:

भारत सरकारला 2022-23 या वर्षात ₹24,55,706 कोटी (आधारभूत वर्ष 2022-23 मधील एकूण प्राप्तीच्या 101%) प्राप्त झाले. यामध्ये ₹20,97,368 कोटी कर महसूल (केंद्राचा एकूण महसूल), ₹2,86,151 कोटी बिगर-कर महसूल आणि ₹72,187 कोटी बिगर-कर्ज भांडवली पावत्यांचा समावेश होता. बिगर-कर्ज भांडवली पावत्यांमध्ये कर्ज वसुली (₹26,152 कोटी) आणि विविध भांडवली पावत्या (₹46,035 कोटी) समाविष्ट आहेत. ₹9,48,406 कोटी, भारत सरकारकडून या कालावधीपर्यंतचा कराचा वाटा म्हणून राज्य सरकारांना हस्तांतरित करण्यात आले असून, ते मागील वर्षाच्या तुलनेत ₹50,015 अधिक आहेत.

भारत सरकारने केलेला एकूण खर्च ₹41,88,837 कोटी (आधारभूत वर्ष 22-23 च्या 100%) असून, त्यापैकी ₹34,52,518 कोटी महसूल खात्यावर आणि ₹7,36,319 कोटी भांडवली खात्यावर खर्च झाले. एकूण महसुली खर्चापैकी, ₹9,28,424 कोटी हे व्याजाच्या देयकांच्या खात्यावर आणि ₹5,30,959 कोटी मुख्य अनुदानाच्या खात्यावर झाला. 

 

* * *

S.Thakur/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1928678) Visitor Counter : 181