कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आयएएस / नागरी सेवा परीक्षा 2022 मधील देशातील अव्वल 20 उमेदवारांचा केला सत्कार


नागरी सेवेतील 2022 ची ही तुकडी "बॅच ऑफ चेंज लीडर्स" आहे, जगातील आघाडीच्या देशांपैकी एक म्हणून 25 वर्षांनंतर भारत स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल तेव्हा या तुकडीतील अधिकारी प्रशासकीय सेवेत प्रमुख पदांवर असतील- डॉ जितेंद्र सिंह

Posted On: 30 MAY 2023 7:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 मे 2023

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी नॉर्थ ब्लॉक मधील कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग मुख्यालयात आयएएस/ नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये उत्तीर्ण झालेल्या  देशातील अव्वल  20 उमेदवारांशी संवाद साधला आणि त्यांचा सत्कार केला. या परीक्षेचा निकाल 23 मे 2023 रोजी जाहीर झाला.

आयएएस / नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये उत्तीर्ण झालेल्या  देशातील अव्वल  20 उमेदवारांपैकी पहिल्या चार तसेच उर्वरित मध्ये  60 टक्के महिला आहेत .  पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या गेल्या 9 नऊ वर्षांमध्ये महिलांच्या सहभागाकडून महिला नेतृत्वाकडे भारत वाटचाल करत असून लोकसंख्याशास्त्रीय बदलाचे हे मोठे प्रतिबिंब आहे असे डॉ जितेंद्र सिंह  म्हणाले.  गेल्या वर्षीही पहिल्या तीन क्रमांकावर महिला होत्या असे सांगून 2023 च्या नागरी सेवा परीक्षेत हॅट्रिक होईल  अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

यावर्षी अव्वल 20 पैकी केवळ  8 अभियंते आहेत आणि एक वैद्यकीय शाखेतील असून उर्वरित इतर  शाखेतील आहेत असे  डॉ जितेंद्र सिंह  यांनी अधोरेखित केले आणि तंत्रज्ञानाच्या योग्य  वापराद्वारे सेवांचे लोकशाहीकरण असे वर्णन करत  त्यांनी या बदलाचे स्वागत केले.

गेल्या काही वर्षांमध्ये होत असलेल्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांचीही त्यांनी दखल घेतली.  ते संपूर्ण भारतातील राज्यांचे  प्रतिनिधित्व करतात कारण हे उमेदवार बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र, केरळ , मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत असे सिंह म्हणाले. हा लिंग आणि लोकसंख्याशास्त्रीय बदल भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशासाठी चांगला आहे असेही त्यांनी नमूद केले.

अव्वल 20 उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे स्वागत करताना केलेल्या भाषणात, डॉ जितेंद्र सिंह यांनी 2022 च्या नागरी सेवेतील तुकडीचे वर्णन “बॅच ऑफ चेंज लीडर्स” असे केले. जगातील आघाडीच्या देशांपैकी एक म्हणून 25 वर्षांनंतर भारत स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल तेव्हा या तुकडीतील अधिकारी प्रशासकीय सेवेत प्रमुख पदांवर असतील असे ते म्हणाले.

आयोगाने एकूण 933 उमेदवारांची (613 पुरुष आणि 310 महिला) खालील विभागणीनुसार विविध सेवांवर नियुक्तीसाठी शिफारस केली आहे:

GENERAL

EWS

OBC

SC

ST

TOTAL

Out of which PwBD

345

99

263

154

72

933

41

 

अव्वल 20 उमेदवारांमध्ये 12 महिला आणि 8 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे.

या प्रसंगी डॉ जितेंद्र सिंह यांनी आयएएस  सिव्हिल लिस्ट 2023 प्रसिद्ध केली.  ई-बुक आयएएस सिव्हिल लिस्ट हा भारत सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमात योगदान देण्याच्या दिशेने विभागाचा एक प्रयत्न आहे. या उपक्रमामुळे  सिव्हिल सूचीच्या प्रकाशनावरील खर्च कमी होऊन  संसाधनांचा आर्थिक विनियोग  देखील होईल.

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1928387) Visitor Counter : 162