दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
“आंतरराष्ट्रीय वाहतूक व्याख्या” या विषयावरील ट्रायच्या ‘कन्सल्टेशन पेपर’वर टिपण्या/त्यावरील टिपण्या प्राप्त करण्यासाठी अंतिम तारखेला मुदतवाढ
Posted On:
30 MAY 2023 5:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 मे 2023
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (टीआरएआय- ट्राय) 02 मे 2023 रोजी "आंतरराष्ट्रीय वाहतूक व्याख्या" या विषयावर एक सल्लामसलतीसंबंधी पेपर जारी केले होते. या पेपरविषयी हितधारकांकडून उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर लेखी टिपण्या प्राप्त करण्याची अंतिम तारीख 30 मे 2023 निश्चित करण्यात आली होती. आणि प्रति टिपण्यांसाठी 13 जून 2023 पर्यंत पाठविण्याची मुदत निश्चित करण्यात आली होती.
उद्योग संघटनेने टिपण्या पाठविण्यासाठी कालावधी वाढवण्याची केलेली विनंती लक्षात घेऊन, लेखी टिपण्या आणि प्रति-टिपणी सादर करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. आता या टिपण्या/प्रति टिपण्या पाठविण्यासाठी अनुक्रमे 20 जून 2023 आणि 04 जुलै 2023 पर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
टिपण्या/प्रति-टिपण्या संबंधितांनी - अखिलेश कुमार त्रिवेदी, सल्लागार (नेटवर्क, स्पेक्ट्रम आणि परवाना), टीआरएआय – ट्राय यांना, शक्यतो इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवाव्यात. यासाठी मेल आय.डी. - advmn@trai.gov.in
कोणत्याही स्पष्टीकरण/माहितीसाठी, अखिलेश कुमार त्रिवेदी, सल्लागार (नेटवर्क, स्पेक्ट्रम आणि परवाना), ट्राय यांच्याशी दूरध्वनी क्रमांक +91-11-23210481 वर संपर्क साधता येईल.
* * *
N.Chitale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1928362)
Visitor Counter : 130