आयुष मंत्रालय
उद्याच्या भव्य ‘योग महोत्सव’करिता हैदराबाद सज्ज
यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योगदिनाची संकल्पना आहे ‘वसुधैव कुटुंबकमसाठी योगाभ्यास’
Posted On:
26 MAY 2023 4:53PM by PIB Mumbai
आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत मोराजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेने उद्या 27 मे, 2023 रोजी येथील हैदराबाद येथील एनसीसी परेड ग्राऊंडवर भव्य ‘योग महोत्सव’ चे आयोजन केले आहे. 21 जून 2023 रोजी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे साजऱ्या होणार्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला 25 दिवस उरले असून त्यानिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय बंदरे, नौवहन, जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
यावेळी बोलताना सर्बानंद सोनोवाल यांनी या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योगदिनाची संकल्पना ‘वसुधैव कुटुंबकमसाठी योगाभ्यास ’ जाहीर केली. तसेच सोनोवाल यांनी या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी विस्तृत योजना कशा तयार केल्या जात आहेत हे अधोरेखित केले. 21 जून रोजी संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या मदतीने अनेक बंदरांवर, अनेक जहाजांवर योगाची प्रमुख प्रात्यक्षिके सादर केली जातील त्यामुळे योगाची ‘ओशन रिंग’ तयार होणार आहे. अनेक देश देखील या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता असल्याची माहिती त्यांनी दिली .
आर्क्टिक ते अंटार्क्टिकापर्यंत योग प्रात्यक्षिके होतील - प्राइम मेरिडियन लाईनवर किंवा त्या जवळ येणारे देश या योग प्रात्यक्षिकांमध्ये सामील होतील. उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरही योगासने केली जातील. स्वालबार्डमधील भारतीय संशोधन तळ हिमाद्री, आणि अंटार्क्टिकामधील तिसरा भारतीय संशोधन तळ भारती देखील जगभरातील इतर लाखो लोकांसोबत या महोत्सवात सामील होण्याची शक्यता आहे असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रमादित्यच्या फ्लाइट डेकवरही योग प्रात्यक्षिके केली जातील.
आज संपूर्ण जग योगाचा सर्वांगीण आरोग्य आणि तंदुरुस्तीचे अतुलनीय साधन म्हणून स्वीकार करत आहे. उद्या सकाळी , हजारो लोक निरोगी मन आणि शरीराच्या या चळवळीत सामील होतील आणि कॉमन योगा प्रोटोकॉल सादर करतील आणि मानवतेच्या कल्याणासाठी संदेश देतील असे पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी किशन रेड्डी म्हणाले, “योग हे उत्तम मन आणि शरीरासाठी अमृत आहे. “आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग भारतमालामध्ये भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल, तटरक्षक दल आणि सीमा रस्ते संघटना यांचा सहभाग असेल.
भारतातील 2 लाखाहून अधिक गावांमध्ये कॉमन योगा प्रोटोकॉल मध्ये लोकांना प्रशिक्षित करण्याची सोय करण्यात आली आहे,” असे केंद्रीय महिला आणि बाल विकास आणि आयुष राज्यमंत्री डॉ मुंजपारा महेंद्रभाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1927573)
Visitor Counter : 178