पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

चित्ता स्थानांतरणाची प्रगती आणि देखरेख तसेच मध्य प्रदेश वन विभाग आणि राष्‍ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांना सल्ला देण्यासाठी चित्ता प्रकल्प सुकाणू समितीची स्थापना

Posted On: 26 MAY 2023 12:35PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने चित्ता प्रकल्प सुकाणू समिती स्थापन केली आहे.मध्य प्रदेश सरकारच्या अतिरिक्त मुख्य सचिवांबरोबर आणि वन विभागाच्या महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या बैठकीत या संदर्भातला निर्णय झाला होता. या सुकाणू समितीचे अध्‍यक्षपद नवी दिल्लीच्या ग्लोबल टायगर फोरमचे सरचिटणीस डॉ. राजेश गोपाल यांच्‍याकडे सोपवण्‍यात आले आहे. देशभरातील विविध ठिकाणचे वन्य जीव अभ्‍यासक, तसेच वन्‍य प्राणी विभागाचे अधिकारी  म्हणून कार्यरत असलेल्या आणखी 10 जणांचा या समितीमध्‍ये सदस्य म्हणून समावेश करण्‍यात आला आहे.

याचबरोबर ज्यावेळी गरज भासेल, त्यावेळी आंतरराष्‍ट्रीय तज्‍ज्ञांबरोबर सल्‍ला मसलती साठी तयार करण्‍यात आलेल्या आंतरराष्‍ट्रीय सल्‍लागार पॅनेल मध्‍ये दक्षिण अफ्रिकेतील तीन आणि नामिबियातील एका  वन्‍य जीवअभ्यासकाचा समावेश करण्यात आला आहे.

कृती दलासाठी निश्चित करण्‍यात आलेले स्वरूप असे राहील-

1. चित्ता संगोपन पुनरावलोकन, प्रगती यांचे निरीक्षण करून मध्य प्रदेश वन विभाग आणि एनटीसीएला सल्ला देण्यासाठी.

2. चित्ता अधिवास इको-टूरिझमसाठी सुरु करण्‍याबाबत नियम निश्चित करण्‍याविषयी सुचना देणे.

3. प्रकल्प उपक्रमांमध्ये समाजभिमुखता येण्‍यासाठी लोकांच्या सहभागाविषयी सूचना देणे

4. सुकाणू समिती दोन वर्षांच्या कालावधीसाठी कार्यान्वित असणार आहे आणि आवश्यकतेनुसार चित्ता संवर्धन प्रकल्पाच्या स्थानी भेट देण्याशिवाय, समिती दर महिन्याला किमान एक बैठक घेईल.

5. समिती आवश्यकतेनुसार कोणत्याही तज्ञांना सल्लामसलत करण्यासाठी आमंत्रित करू शकते.

6. आंतरराष्ट्रीय चित्ता तज्ञांच्या समूहाचा सल्ला घेतला जाईल किंवा विशिष्ट गरजेनुसार भारतात त्या सदस्यांना आमंत्रित केले जाईल.

7. एनटीसीए, पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय या समितीचे काम सुलभ करेल.

8. अशासकीय सदस्यांचा प्रवास खर्च आणि इतर आनुषंगिक खर्च सध्याच्या नियमांनुसार एनटीसीएद्वारे केला जाईल.

***

N.Chitale/S.Bedekar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1927490) Visitor Counter : 164