कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा तिसरा अग्रिम अंदाज केला जारी


2022-23 या वर्षासाठी 3305.34 लाख टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाजः तोमर

तांदूळ, गहू, मका, सोयाबीन, मोहरी आणि उसाच्या विक्रमी उत्पादनाचा अंदाजः केंद्रीय कृषिमंत्री

शेतकऱ्यांची मेहनत, शास्त्रज्ञांचे प्राविण्य आणि सरकारचे शेतकरी हिताचे धोरण यामुळे कृषी क्षेत्र दिवसेंदिवस विकसित होत आहे: तोमर

Posted On: 25 MAY 2023 7:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 मे 2023

 

कृषी वर्ष 2022-23 साठी प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा तिसरा अग्रिम अंदाज कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केला आहे. यावेळी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर  म्हणाले की, चालू कृषी वर्षात 3305.34 लाख टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांची मेहनत,  शास्त्रज्ञांचे प्राविण्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण यामुळे कृषी क्षेत्र दिवसेंदिवस विकसित होत आहे.

वेगवेगळ्या पिकांच्या उत्पादनाचे मूल्यमापन राज्यांकडून मिळालेल्या प्रतिसादावर आधारित असून  इतर स्त्रोतांकडून उपलब्ध असलेल्या माहितीबरोबर त्याची पडताळणी केली जाते. राज्ये , पर्यायी स्रोत आणि इतर घटकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या मूल्यांकनात आणखी सुधारणा  केली जाईल.

2022-23 च्या तिसऱ्या अग्रिम  अंदाजानुसार, देशातील एकूण अन्नधान्य उत्पादन विक्रमी 3305.34 लाख टन राहील असा अंदाज आहे, जे  मागील वर्ष 2021-22 च्या तुलनेत 149.18 लाख मेट्रिक टनने अधिक आहे.

2022-23 मध्ये तांदळाचे एकूण उत्पादन (विक्रमी) 1355.42 लाख मेट्रिक टन असल्याचा अंदाज आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ते 60.71 लाख टनांनी जास्त आहे.

देशात गव्हाचे (विक्रमी) उत्पादन 1127.43 लाख मेट्रिक टन अंदाजित आहे जे मागील वर्षीच्या उत्पादनाच्या तुलनेत 50.01 लाख मेट्रिक टनने जास्त आहे.

देशात 2022-23 मध्ये मक्याचे उत्पादन अंदाजे (विक्रमी) 359.13 लाख मेट्रिक टन आहे जे मागील वर्षीच्या उत्पादनापेक्षा 21.83 लाख टनांनी जास्त आहे.

2022-23 मध्ये एकूण डाळ उत्पादन अंदाजे 275.04 लाख मेट्रिक टन आहे जे मागील वर्षीच्या 273.02 लाख मेट्रिक टन उत्पादनापेक्षा 2.02 लाख टन जास्त आहे.

2022-23 मध्ये देशातील एकूण तेलबियांचे उत्पादन अंदाजे 409.96 लाख मेट्रिक टन इतके आहे जे मागील वर्षीच्या तेलबिया उत्पादनाच्या तुलनेत 30.33 लाख टन अधिक आहे.

2022-23 मध्ये देशात एकूण ऊस उत्पादनाचा अंदाज 4942.28 लाख मेट्रिक टन इतका आहे. 2022-23 मध्ये उसाचे उत्पादन मागील वर्षीच्या उत्पादनापेक्षा 548.03 लाख मेट्रिक टनने जास्त आहे.

कापसाचे उत्पादन अंदाजे 343.47 लाख गाठी (प्रत्येकी 170 किलो) आणि ताग आणि मेस्ताचे उत्पादनअंदाजे 94.94 लाख गाठी  (प्रत्येकी 180 किलो)  आहे.

2022-23 च्या तिसर्‍या अग्रिम  अंदाजानुसार विविध पिकांचे अंदाजे उत्पादन आणि 2012-13 नंतरच्या वर्षातील तुलनात्मक अंदाज पुढे जोडला  आहे.

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1927324) Visitor Counter : 323