पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फिजी प्रजासत्ताकच्या पंतप्रधानांबरोबर बैठक
Posted On:
22 MAY 2023 2:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मे 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मे 2023 रोजी पोर्ट मोरेस्बी येथे फिजी प्रजासत्ताकचे पंतप्रधान सीतवेनी लिगामामादा राबुका यांची हिंद-प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या (FIPIC) तिसर्या शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट घेतली. .दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती. नोव्हेंबर 2014 मध्ये फिजी भेटीदरम्यान FIPIC चा प्रारंभ करण्यात आल्याची आठवण पंतप्रधानांनी सांगितली आणि तेव्हापासून प्रशांत द्वीपसमूह देशांसोबत भारताचे सहकार्य अधिक दृढ झाल्याचे नमूद केले.
उभय नेत्यांनी दोन्ही देशांमधील घनिष्ठ आणि बहुआयामी विकास भागीदारीचा आढावा घेतला आणि क्षमता निर्मिती , आरोग्य सेवा, हवामान कृती, नवीकरणीय ऊर्जा, कृषी, शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञान यासह प्रमुख क्षेत्रातील प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक घडामोडींवरही विचारांची देवाणघेवाण केली आणि बहुपक्षीय व्यासपीठांवर सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत सहमती दर्शवली.. फिजीचे राष्ट्रपती रतु विलियम मायवाली काटोनिवेरे यांच्या वतीने पंतप्रधान राबुका यांनी पंतप्रधान मोदी यांना फिजीचा कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी (CF) हा सर्वोच्च सन्मान प्रदान केला. पंतप्रधान मोदी यांनी या सन्मानाबद्दल फिजी सरकार आणि तेथील जनतेचे आभार मानले आणि हा सन्मान भारताच्या जनतेला आणि फिजी-भारतीय समुदायाच्या पिढ्यांना समर्पित केला, ज्यांनी दोन्ही देशांमधील विशेष आणि चिरकाल संबंधात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
* * *
S.Bedekar/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1926302)
Visitor Counter : 161
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam