पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट
Posted On:
20 MAY 2023 7:01PM by PIB Mumbai
पंतप्रधानांनी 20 मे 2023 रोजी हिरोशिमा येथे G-7 परिषदेच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली.
युक्रेनमधल्या संघर्षाचा संपूर्ण जगावर लक्षणीय परिणाम झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. मात्र, आपल्यासाठी हा राजकीय किंवा आर्थिक प्रश्न नसून मानवतेचा, मानवी मूल्यांचा प्रश्न आहे, यावर त्यांनी भर दिला.
भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी युक्रेनने केलेल्या सहकार्याची पंतप्रधानांनी प्रशंसा केली, आणि विद्यार्थ्यांसाठी भारतात परीक्षा घेण्याच्या युक्रेनच्या संस्थांनी घेतलेल्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.
संघर्षमय स्थितीमधून पुढचा मार्ग शोधण्यासाठी, भारताचा संवाद आणि मुत्सद्देगिरीला स्पष्ट पाठिंबा असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते म्हणाले की, परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी भारत आणि वैयक्तिकरित्या पंतप्रधान आपल्या क्षमतेनुसार सर्वकाही करतील.
युक्रेनच्या लोकांना भारत यापुढेही मानवतावादी मदत करत राहील, असे पंतप्रधान म्हणाले. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधानांना युक्रेनमधील सद्यस्थितीची माहिती दिली. एकमेकांच्या संपर्कात राहण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती झाली.
***
R.Aghor/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1925947)
Visitor Counter : 182
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam