रसायन आणि खते मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली आशिया पेट्रोकेमिकल उद्योग परिषद 2023
Posted On:
19 MAY 2023 2:55PM by PIB Mumbai
“भारत जागतिक स्तरावर पेट्रोकेमिकल्सचे नवे केंद्र बनणार आहे. आपल्या व्यवसाय पूरक धोरणांमुळे, जग भारताकडे विश्वासू भागीदार आणि गुंतवणुकीसाठी पसंतीचे ठिकाण म्हणून पाहते.” असे केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी आज दिल्ली येथे आशिया पेट्रोकेमिकल उद्योग परिषद 2023 च्या अध्यक्षपद भूषविताना सांगितले. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यावेळी उपस्थित होते. “शाश्वत भविष्याची सुरुवात” अशी या कार्यक्रमाची संकल्पना होती.


सात सदस्य राष्ट्रांतील १२०० हून अधिक प्रतिनिधी तसेच युरोप, चीन, अमेरिका, मध्य पूर्व आणि इतर आशियाई देशांतील प्रतिनिधी यात सहभागी झाले होते.याशिवाय इतर प्रमुख राष्ट्रांचे वरिष्ठ सरकारी अधिकारी तसेच पेट्रोकेमिकल क्षेत्रातील प्रादेशिक आणि जागतिक भागीदारांनी या परिषदेत भाग घेतला.
डॉ. मनसुख मांडविया म्हणाले की, भारतीय रासायनिक उत्पादन उद्योग खरोखरच पेट्रोकेमिकल्ससाठी उदयोन्मुख जागतिक निर्मिती केंद्र बनला आहे.
पुढील 25 वर्षांसाठीच्या सरकारच्या दीर्घकालीन योजना म्हणजेच अमृत काळबाबत बोलताना डॉ. मनसुख मांडविया यांनी अधोरेखित केले की भारत शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करून वर्तमान आणि भविष्यातील निर्णय घेत आपली धोरणे आखत आहे.
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी पेट्रोकेमिकल उद्योगाच्या क्षेत्रात नवीन, लवचिक आणि आत्मनिर्भर भारताची प्रगती अधोरेखित केली.
***
S.Kane/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1925534)
Visitor Counter : 194