पंतप्रधान कार्यालय
इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
कृषी, जल, नवोन्मेष आणि नागरिकांमधील परस्परसंबंध या प्राधान्यक्षेत्रांवर असलेल्या द्विपक्षीय सहकार्याअंतर्गत दोन्ही नेत्यांनी केली चर्चा
पंतप्रधानांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
09 MAY 2023 9:00PM by PIB Mumbai
इस्रायलचे परराष्ट्र मंत्री महामहिम एली कोहेन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. द्विपक्षीय सहकार्याच्या विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली. यामध्ये कृषी, जल, नवोन्मेष आणि दोन्ही अर्थव्यवस्थांमधील व्यापक पूरक घटकांचा लाभ करून घेण्याकरता ज्ञानाधिष्ठित भागीदारी आणि नागरिकांमधील परस्परसंबंध मजबूत करणे अशा प्राधान्यक्षेत्रांचा समावेश होता.
परस्पर हिताच्या विविध प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवरही उभय नेत्यांनी आपापल्याविचारांची देवाणघेवाण केली.
पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र मंत्री एली कोहेन यांना इस्रायलचे पंतप्रधान महामहिम बेंजामिन नेतन्याहू यांना शुभेच्छा दिल्या.
***
Sonal T/Umesh K/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1924690)
आगंतुक पटल : 163
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada