पंतप्रधान कार्यालय
उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून पीडितांसाठी मदत केली जाहीर
Posted On:
16 MAY 2023 7:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 मे 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातल्या रस्ते अपघातातील जीवित हानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मोदी यांनी पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
“उत्तर प्रदेशमधील फतेहपूर इथे झालेला रस्ते अपघात अत्यंत दुःखद आहे. या अपघातात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्याचबरोबर जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी प्रार्थना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत पुरवत आहे : पंतप्रधान मोदी ”
“पंतप्रधान @narendramodi यांनी फतेहपूर येथील दुर्घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे , तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये देण्यात येतील. ”
S.Bedekar/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1924616)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam