जलशक्ती मंत्रालय

जल जीवन मिशनने नळजोडणी देण्‍याचा 12 कोटीचा टप्पा गाठला


देशभरातील 9.06 लाख शाळा आणि 9.39 लाख अंगणवाडी केंद्रांमध्ये नळाने पाणीपुरवठा

आर्सेनिक/फ्लोराइड दूषित पाणी असलेल्या 22,016 वस्त्यांमध्ये आता जल जीवन मिशन अंतर्गत पिण्याचे सुरक्षित पाणी उपलब्ध आहे

Posted On: 16 MAY 2023 7:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2023

स्वातंत्र्याच्या अमृत काळात जल जीवन मिशनने  देशातील 12 कोटींहून अधिक ग्रामीण कुटुंबांना नळांद्वारे सुरक्षित आणि शुद्ध पिण्याचे पाणी सुनिश्चित करण्याचा महत्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. 15 ऑगस्ट 2019 रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल जीवन मिशनच्या शुभारंभाची घोषणा केली, तेव्हा गावांमध्ये  केवळ 3.23 कोटी (16.64%) कुटुंबांना जलवाहिनीव्दारे पाणी पुरवले जात होते.

आतापर्यंत, 5 राज्ये (गोवा, तेलंगणा, हरियाणा, गुजरात आणि पंजाब) आणि 3 केंद्रशासित प्रदेश (पुडुचेरी, दीव आणि दमण आणि दादरा आणि नगर हवेली  आणि अंदमान आणि निकोबार  बेटे) येथे 100% जलवाहिनीव्‍दारे पाणी जनतेला दिले जाते.  हिमाचल प्रदेश  98.35%, त्या खालोखाल  बिहार 96.05% देखील नजीकच्या काळात शंभर टक्के कव्हरेज साध्य करण्यासाठी सज्ज आहेत. गोवा, हरियाणा, पंजाब, अंदमान आणि निकोबार  बेटे, पुडुचेरी, दीव आणि दमण आणि दादरा आणि नगर हवेली  हे 'हर घर जल प्रमाणित राज्ये/केंद्रशासित प्रदेश आहेत, म्हणजे या राज्ये /केंद्रशासित प्रदेशांमध्ये, गावकऱ्यांनी ग्रामसभांद्वारे सुनिश्चित केले आहे की गावातील 'सर्व घरे आणि सार्वजनिक संस्थाना ' पुरेसा, सुरक्षित आणि नियमित पाणी पुरवठा मिळेल.

केंद्र आणि राज्य सरकारांच्या अथक प्रयत्नांमुळे देशातील 9.06 लाख (88.55%) शाळा आणि 9.39 लाख (84%) अंगणवाडी केंद्रांमध्ये नळाद्वारे पाण्याची व्यवस्था सुनिश्चित झाली  आहे.  मिशनच्या उदघाटनाच्या  वेळी, केवळ 21.64 लाख (7.84%) कुटुंबांना नळाद्वारे पाण्याची सुविधा उपलब्ध होती जी आता 1.67 कोटी (60.51%) वर गेली आहे.

जलजीवन मिशनच्या प्रारंभाच्या  वेळी, 1.79 कोटी लोकसंख्या असलेल्या 22,016 वस्त्या (आर्सेनिक- 14,020, फ्लोराईड- 7,996), पिण्याच्या पाण्यातील आर्सेनिक/फ्लोराइड दूषित पाण्यामुळे  1.79 कोटी लोकसंख्या (आर्सेनिक-1.19 कोटी, फ्लोराईड-0.59 कोटी) बाधित झाल्या होत्या.  राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या अहवालानुसार, आता सर्व आर्सेनिक/फ्लोराइड-प्रभावित वस्त्यांमध्ये पिण्याचे सुरक्षित पाणी उपलब्ध आहे.

 

 

 

 

S.Bedekar/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1924606) Visitor Counter : 143