विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्टार्टअप्सची वाढ आणि प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी लवकरच एक यंत्रणा विकसित करण्याचा प्रयत्न सुरु आहे- डॉ. जितेंद्र सिंह


स्टार्ट अप क्षेत्रात संकल्पना आधारित प्रकल्प सुचवले असून पुढील आठवड्यात ते सुरू केले जातील- डॉ.जितेंद्र सिंह

Posted On: 14 MAY 2023 4:02PM by PIB Mumbai

 

भारतात स्टार्टअप्सची संख्या एक लाखाहून अधिक वाढल्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ.जितेंद्र सिंह यांनी स्टार्टअप्सच्या वाढीवर आणि प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी एक यंत्रणा स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

"अशी यंत्रणा विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे जी या स्टार्टअप्सच्या वाढीचा बारकाईने पाठपुरावा करेल, त्यांचे अस्तित्व कायम राखण्याकडे लक्ष देईल, विशेषत: ज्या स्टार्टअप्सना सरकारकडून तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य मिळाले आहे जेणेकरून त्यांचे नुकसान होणार नाही " असे सिंह म्हणाले. ते आज नवी दिल्लीतील  प्रगती मैदान येथे राष्ट्रीय तंत्रज्ञान सप्ताह प्रदर्शनाचा समारोप समारंभ आणि पुरस्कार समारंभाला संबोधित करत होते.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आता तिसरी पिढी कार्यरत असून आता त्यांचा कल माहिती तंत्रज्ञानाकडून जैवतंत्रज्ञान आणि भूविज्ञानाकडे वळला आहे आणि समुद्रविज्ञान क्षेत्रात देखील नवनवीन संधी खुल्या झाल्या  आहेत, असे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री म्हणाले.

"ही तिसरी पिढी सर्वात भाग्यवान आहे कारण ती आता 'त्यांच्या आकांक्षां आता बंदिस्त राहिल्या नाहीत," असे सांगत डॉ.  जितेंद्र सिंह  म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिमान नेतृत्वाखाली नवोन्मेषाचा  साक्षीदार होत असलेल्या भारताचा हा सर्वोत्तम काळ आहे.”

डॉ.  जितेंद्र सिंह  म्हणाले की, आपण स्टार्टअप्सच्या बाबतीत असलेल्या मिथकांपासून दूर रहायला हवे. “यातील एक आहे  वय, मी एका वैज्ञानिकाला निवृत्तीनंतर स्टार्टअप उभारताना पाहिले आहे; दुसरे म्हणजे उच्च पात्रता, ज्याची  सर्जनशीलतेसाठी मनापासून काम करण्याची वृत्ती असेल असे कोणीही नवोन्मेषक बनू शकतील , असे ते म्हणाले.

त्यांनी  संकल्पना आधारित प्रकल्प सुचवले आणि त्यावर  पुढील आठवड्यात काम  सुरू केले जाईल असे सांगितले. डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, राष्ट्रीय तंत्रज्ञान सप्ताह प्रदर्शन हे पंतप्रधान मोदी यांनी मांडलेल्या "संपूर्ण सरकार" दृष्टिकोनाचे एक उदाहरण आहे, 12 हून अधिक केंद्रीय मंत्रालये आणि विभाग एक भव्य शो आयोजित करण्यासाठी एकत्र आले आहेत.

याप्रसंगी डॉ जितेंद्र सिंह यांना राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर्षी प्रख्यात शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांच्या समितीने काटेकोर द्वि-स्तरीय मूल्यमापन प्रक्रियेनंतर एकूण 11 विजेत्यांची निवड केली.  या वर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पना  ‘स्कूल टू स्टार्ट – अप – इग्नाइटिंग यंग माइंड्स टू इनोव्हेट’ अशी होती, या कार्यक्रमात अटल टिंकरिंग लॅब्स (भारत सरकारच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत) सह देशभरातील शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते आणि त्यांनी तंत्रज्ञान विषयक नवोन्मेषाचे सादरीकरण केले.

***

R.Aghor/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1924049) Visitor Counter : 155