सांस्कृतिक मंत्रालय
‘जनशक्ती: एक सामूहिक शक्ती’ हे प्रदर्शन पाहण्यासाठी पंतप्रधानांनी नवी दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टला दिली भेट
Posted On:
14 MAY 2023 2:14PM by PIB Mumbai
‘जनशक्ती: एक सामूहिक शक्ती’ हे प्रदर्शन पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टला भेट दिली. पंतप्रधानांचा रेडिओवरून प्रसारित होणारा लोकप्रिय कार्यक्रम 'मन की बात'च्या 100 व्या भागाच्या निमित्ताने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन भारतातील कलात्मक विविधतेचे दर्शन घडवणारे असून ‘मन की बात’ मध्ये अधोरेखित केलेल्या संकल्पनांपासून प्रेरित आहे.
पंतप्रधानांना या प्रदर्शनाच्या विशेष सफरीवर नेण्यात आले. त्यामुळे उपस्थित कलाकारांना त्यांच्या कलाकृती आणि त्यांच्या कलाकृतींना प्रेरणा देणारी ‘मन की बात’ची संकल्पना स्पष्ट करण्याची संधी मिळाली. पंतप्रधानांनी जयपूर हाऊसच्या ऐतिहासिक घुमटावर जनशक्ती प्रदर्शनाचा त्रिमीतीय प्रोजेक्शन शो देखील पाहिला. कलाकृती पाहिल्यानंतर, पंतप्रधानांनी जनशक्ती प्रदर्शन अभिप्राय नोंदवहीवर स्वाक्षरी केली आणि संदेश लिहिला, "मन मंदिर की यात्रा सुखद हो.." असा संदेशही लिहीला. या अभिप्राय नोंदवहीवर 13 कलाकारांनी देखील स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
तेरा प्रसिद्ध आधुनिक आणि समकालीन कलाकारांनी स्वतःला व्यक्त करण्यासाठी आणि बारा संकल्पनांवर Prime Minister's या पंतप्रधानांच्या संदेशाचे कलात्मक प्रतिनिधित्व करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला आहे. प्रत्येक संकल्पना जलसंधारण, नारी शक्ती, कोविड विषयी जागरूकता, स्वच्छ भारत, पर्यावरण, हवामान बदल, भारतीय शेती, योग, आयुर्वेद, भारतीय विज्ञान, अंतराळ, क्रीडा, फिटनेस, भारत @ 75, अमृत काळ , ईशान्य भारत आणि भारत तसेच आणि यांसारख्या विविध विषयाशी संबंधित आहे.
माधवी पारेख, मनु पारेख, अतुल डोडिया, रियास कोमू, जी आर इराणा, अशिम पुरकायस्थ, जितेन ठुकराल; सुमीर तगरा, परेश मैती, प्रतुल दाश, जगन्नाथ पांडा, मंजुनाथ एच कामथ आणि विभा गल्होत्रा या कलाकारांच्या कलाकृती प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत.
सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन, किरण नाडर कला संग्रहालयाच्या संस्थापक किरण नाडर, प्रदर्शनाच्या क्युरेटर डॉ. अलका पांडे यांच्यासह सांस्कृतिक मंत्रालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, नवी दिल्लीचे इतर सर्व अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
***
R.Aghor/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1924034)
Visitor Counter : 171