गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह सोमवारी नवी दिल्लीत कायदेविषयक मसुद्याच्या निर्मितीसंदर्भातील प्रशिक्षण कार्यक्रमाचे करणार उद्घाटन
संसदे, राज्य विधिमंडळे, विविध मंत्रालये, वैधानिक मंडळे आणि इतर सरकारी विभागांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कायदेविषयक मसुद्याच्या निर्मितीचे सिद्धांत आणि पद्धतींची माहिती करून देण्याचा या कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश
Posted On:
14 MAY 2023 12:58PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह सोमवारी 15 मे 2023 रोजी नवी दिल्लीत कायदेविषयक मसुद्याच्या निर्मितीसंदर्भातील प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. संसदे, राज्य विधिमंडळे, विविध मंत्रालये, वैधानिक मंडळे आणि इतर सरकारी विभागांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कायदेविषयक मसुद्याच्या निर्मितीचे सिद्धांत आणि पद्धतींची माहिती करून देण्याच्या उद्देशाने, घटनात्मक आणि संसदीय अभ्यास संस्था (ICPS) कडून लोकशाही संसदीय संशोधन आणि प्रशिक्षण संस्था(PRIDE) च्या सहकार्याने हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. कायद्याच्या मसुद्याच्या निर्मितीचा समाजाच्या आणि देशाच्या कल्याणासाठी करण्यात आलेली धोरणे आणि नियामक यांचा अर्थ लावण्यावर मोठा प्रभाव आहे. कायदेविषयक मसुदा तयार करणारे लोकशाही शासनाला चालना देणारा आणि कायद्याचे राज्य प्रत्यक्षात आणणारा कायदा तयार करण्यासाठी जबाबदार असतात त्यामुळे त्यांची कौशल्ये अधिक प्रभावी बनवण्यासाठी त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देत राहणे गरजेचे असते. या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे त्यांना क्षमता उभारणीसाठी मदत होणार आहे.
***
R.Aghor/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1924021)
Visitor Counter : 167