सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

आत्मनिर्भर भारत आणि निर्यात प्रोत्साहन साध्य करण्यासाठी एमएसएमईच्या प्रगत उत्पादन क्षमतांना प्रोत्साहन देण्यासाठी आयातीला पर्याय आणि रचनात्मक उपाययोजनांसाठी  आरोग्य हे लक्ष्य क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आले- नारायण राणे

Posted On: 04 MAY 2023 5:24PM by PIB Mumbai

 

केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्री  नारायण राणे यांनी 3 मे 2023 रोजी नवी दिल्ली येथे इंडिया हेल्थ डायलॉग प्लॅटफॉर्मचा (भारत आरोग्य संवाद मंच )प्रारंभ केला.  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताला जागतिक उत्पादन केंद्र  बनवण्यासाठी आणि सर्व बाबतीत आत्मनिर्भर बनवण्यासाठी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग  मंत्रालय भविष्यासाठी लवचिक जागतिक पुरवठा साखळी तयार करण्यासाठी  काम करत आहे, असे राणे यांनी यावेळी सांगितले.   मंत्रालयाने आयातीला पर्याय शोधण्यासाठी आरोग्य हे लक्ष्य क्षेत्र म्हणून निश्चित केले आहे आणि आत्मनिर्भर भारताची उद्दिष्टे  साध्य करण्यासाठी आणि आरोग्य क्षेत्रात निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एमएसएमई क्षेत्रातील  प्रगत  उत्पादन क्षमतांना प्रोत्साहन देण्यासाठी रचनात्मक उपाययोजनांसाठी आयएचडी अर्थात भारत आरोग्य संवाद सोबत भागीदारी करत आहे

Image

नवी दिल्ली एम्स येथील  आयसीएमआर अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी  जागतिक आरोग्यविषयक  उद्योगातील प्रमुख तज्ज्ञ  आणि उद्योग अग्रणी उपस्थित होते.  संपूर्ण देश आत्मनिर्भरतेसाठी प्रयत्न करत असून   आगामी कालानुरूप  तंत्रज्ञान आणि नवकल्पना भारतातील आरोग्याच्या प्रत्येक पैलूत बदल घडवून आणतील, असे मत तज्ज्ञांनी यावेळी व्यक्त केले. अत्याधुनिक तंत्रज्ञान भारताचे भविष्य  घडवणार आहे.  भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी तसंच  आरोग्य व  आरोग्यसेवा या दोन्ही क्षेत्रांमध्ये भारताला  उत्पादन केंद्र बनवण्यासाठी प्रगत उत्पादन परिसंस्था निर्माण करण्यात एमएसएमई   मंत्रालयाची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

इंडिया हेल्थ डायलॉग - एक सहयोगी आणि हितधारक मंच असून  हा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) , इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने  इंडिया चेंबर ऑफ बिझनेस अँड कॉमर्सचा  जागतिक उपक्रम आहे.  भविष्यासाठी आरोग्य आणि आरोग्य सेवा  क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी परिसंस्था निर्माण करण्याकरिता  सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे पाठबळ या उपक्रमाला आहे.

***

S.Kane/S.Kakade/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1922023) Visitor Counter : 133


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu