दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अंतराळ आधारित संपर्क सेवेसाठी स्पेक्ट्रम प्रदान करण्याबाबत ट्राय विचारविनिमय पत्रावर टिप्पण्या / प्रति- टिप्पण्या सादर करण्यासाठी मुदतवाढ

Posted On: 02 MAY 2023 7:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मे 2023

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने ‘अंतराळ आधारित संपर्क सेवेसाठी स्पेक्ट्रम प्रदान’ करण्याबाबत 6 एप्रिल 2023 रोजी विचारविनिमय पत्र जारी केले होते. या विचारविनिमय पत्रात उपस्थित केलेल्या समस्यांबाबत संबंधितांकडून लेखी स्वरूपात टिप्पण्या सादर करण्यासाठी 4 मे 2023 तर प्रति टिप्पण्या सादर  करण्यासाठी 18 मे 2023 ही अंतिम दिनांक जारी केली होती.

यावर हितधारक आणि औद्योगिक संघटनांकडून  टिप्पण्या सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत आलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने  टिप्पण्या आणि प्रति  टिप्पण्या सादर करायला अनुक्रमे 18 मे 2023 आणि 1 जून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  यानंतर मात्र  मुदत वाढ देण्याबाबत विचार केला जाणार नाही.

या टिप्पण्या ट्रायचे सल्लागार (नेटवर्क्स, स्पेक्ट्रम आणि परवाना) अखिलेश कुमार त्रिवेदी यांच्याकडे शक्यतो इलेक्ट्रॉनिक अर्ज स्वरूपात advmn@trai.gov.in यावर पाठवता येणार असून याबाबत काही शंका असल्यास किंवा माहिती हवी असल्यास त्यांच्याशी +91-11-23210481 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

 

S.Patil/S.Naik/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1921449) Visitor Counter : 141