इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने नागरिकांना आधारशी संलग्न ईमेल/मोबाइल क्रमांकाची पडताळणी करण्याची सुविधा दिली

Posted On: 02 MAY 2023 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मे 2023

वापरकर्त्याचे फायदे लक्षात घेऊन, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) ने नागरिकांना  आधारशी संलग्न ईमेल/मोबाइल क्रमांकाची पडताळणी करण्याची परवानगी दिली आहे.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाला असे आढळून आले की काही प्रकरणांमध्ये , नागरिकांना  त्यांचा कोणता मोबाईल क्रमांक त्यांच्या आधारशी जोडला आहे याबद्दल माहिती किंवा खात्री नव्हती. त्यामुळे आधार ओटीपी दुसऱ्या कुठल्यातरी मोबाईल क्रमांकावर जात असल्याची भीती नागरिकांना वाटत होती. आता या सुविधेमुळे नागरिकांना अगदी सहजपणे हे तपासता येईल.

अधिकृत संकेतस्थळावर (https://myaadhaar.uidai.gov.in/) किंवा mAadhaar ऍपद्वारे  ‘'व्हेरिफाय ईमेल /मोबाईल नंबर शीर्षकाखाली ही  सुविधा उपलब्ध आहे. नागरिकांना त्यांचा स्वतःचा ईमेल/मोबाईल क्रमांक संबंधित आधारशी जोडलेला आहे की नाही याची  पडताळणी करण्यासाठी हे विकसित केले आहे.

ही सुविधा नागरिकांना खात्री पटवून देते की त्याच्या/तिच्या माहितीनुसार ईमेल/मोबाईल क्रमांक संबंधित आधारशी जोडलेला आहे. तसेच एखादा  विशिष्ट मोबाइल क्रमांक संलग्न नसल्यास तसे नागरिकांना सूचित करते आणि नागरिकांची इच्छा असल्यास, मोबाइल क्रमांक  अपडेट करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची सूचना करते.

जर मोबाईल क्रमांकाची आधीच पडताळणी झाली असेल तर नागरिकांना  त्यांच्या स्क्रीनवर , ‘तुम्ही प्रविष्ट केलेला  मोबाइल क्रमांक आमच्या नोंदीशी यापूर्वीच पडताळून पाहण्यात आला  आहे’ असा संदेश दिसेल.

जर नागरिकांना नावनोंदणी दरम्यान दिलेला मोबाईल क्रमांक आठवत नसेल, तर  Myadhaar पोर्टल किंवा mAadhaar ऍपवर  Verify Aadhaar शीर्षकावर मोबाईल क्रमांकाचे  शेवटचे तीन अंक तपासून पाहता येतील.

जर नागरिकांची   ईमेल/मोबाइल क्रमांक आधारशी जोडण्याची इच्छा  असेल किंवा तिला/त्याचा ईमेल/मोबाइल क्रमांक अपडेट करायचा  असेल, तर ती/तो जवळच्या आधार केंद्राला भेट देऊ शकतो.

S.Patil/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 1921406) Visitor Counter : 355