अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एप्रिल 2023 मधे देशभरात आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी 1.87 लाख कोटी रुपयांचा जीएसटी महसूल संकलित, महाराष्ट्रात या महिन्यात 33,196 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन


एप्रिल 2023 मधील एकत्रित जीएसटी संकलन आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर, एप्रिल 2022 मधील 1,67,540 लाख कोटी रुपयांच्या जीएसटी संकलनापेक्षा 19,495 कोटी रुपयांनी जास्त संकलन

लागोपाठच्या वर्षांतील जीएसटी महसुलाची तुलना करता एप्रिल 2023 मध्ये सरकारला 12%अधिक जीएसटी महसूल मिळाला आहे

20 एप्रिल 2023 रोजी करण्यात आलेल्या 9.8 लाख व्यवहारांच्या माध्यमातून दैनंदिन पातळीवरील सर्वात जास्त म्हणजे 68,228 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन

Posted On: 01 MAY 2023 5:46PM by PIB Mumbai

 

एप्रिल 2023 मध्ये 1,87,035 कोटी रुपयांचे एकत्रित जीएसटी महसूल संकलन झाले आहे. यामध्ये CGST 38,440 कोटी रुपये, SGST 47,412 कोटी रुपये, IGST 89,158 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीमधून गोळा केलेल्या 34,972 कोटी रुपयांसह) आणि अधिभार 12,025 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीमधून गोळा केलेल्या 901 कोटी रुपयांसह) यांचा समावेश आहे. एप्रिल 2023 मध्ये महाराष्ट्रात एकूण 33,196 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन करण्यात आले आहे.

सरकारने IGST मधून नियमित थकबाकीपोटी  45,864 कोटी रुपयांच्या CGST ची आणि  37,959 कोटी रुपयांच्या SGST ची थकबाकी चुकती केली आहे. नियमित थकबाकी चुकती केल्यानंतर एप्रिल 2023 या महिन्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून CGST साठी 84,304 कोटी रुपये आणि SGST साठी 85,371 कोटी रुपये इतका महसूल जमा झाला आहे.

एप्रिल 2023 महिन्यात जीएसटीपोटी गोळा झालेला महसूलमागील वर्षी याच महिन्यात संकलित जीएसटी महसुलापेक्षा 12% नी अधिक आहे. या वर्षी एप्रिल महिन्यात (सेवांच्या आयातीसह) देशांतर्गत व्यवहारांद्वारे जमा झालेला महसूल गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 16% नी जास्त आहे.

देशातील एकूण जीएसटी संकलनाने या महिन्यात प्रथमच 1.75 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मार्च 2023 मध्ये जारी करण्यात आलेल्या एकूण ई-वे बिलांची संख्या 9.0 कोटी  होती. ही आकडेवारी, फेब्रुवारी 2023 मध्ये जारी करण्यात आलेल्या 8.1 कोटी ई-वे बिलांपेक्षा 11% नी अधिक आहे.

एप्रिल 2023 मध्ये 20 तारखेला दैनंदिन पातळीवरील आतापर्यंतचे सर्वाधिक कर संकलन झाले. या दिवशी 9.8 लाख व्यवहारांच्या माध्यमातून, 68,228 कोटी रुपये कर संकलित करण्यात आला. गेल्या वर्षी याच तारखेला एका दिवसातील सर्वात जास्त कर संकलन झाले होते आणि तेव्हा 9.6 लाख व्यवहारांच्या माध्यमातून 57,846 कोटी रुपये संकलित करण्यात आले होते.

खालील तक्ता यंदाच्या वर्षातील एकूण मासिक जीएसटी महसूल संकलनाचे प्रकार दर्शवतो. या तक्त्यामध्ये एप्रिल 2022 च्या तुलनेत एप्रिल 2023 मध्ये संकलित झालेल्या जीएसटीची राज्यनिहाय आकडेवारी दिली आहे.

एप्रिल 2023 दरम्यान जीएसटी महसुलात झालेली राज्यनिहाय वाढ

 

State/UT

Apr-22

Apr-23

Growth (%)

Jammu and Kashmir

560

803

44

Himachal Pradesh

817

957

17

Punjab

1,994

2,316

16

Chandigarh

249

255

2

Uttarakhand

1,887

2,148

14

Haryana

8,197

10,035

22

Delhi

5,871

6,320

8

Rajasthan

4,547

4,785

5

Uttar Pradesh

8,534

10,320

21

Bihar

1,471

1,625

11

Sikkim

264

426

61

Arunachal Pradesh

196

238

21

Nagaland

68

88

29

Manipur

69

91

32

Mizoram

46

71

53

Tripura

107

133

25

Meghalaya

227

239

6

Assam

1,313

1,513

15

West Bengal

5,644

6,447

14

Jharkhand

3,100

3,701

19

Odisha

4,910

5,036

3

Chhattisgarh

2,977

3,508

18

Madhya Pradesh

3,339

4,267

28

Gujarat

11,264

11,721

4

Dadra and Nagar Haveli and Daman and Diu

381

399

5

Maharashtra

27,495

33,196

21

Karnataka

11,820

14,593

23

Goa

470

620

32

Lakshadweep

3

3

-7

Kerala

2,689

3,010

12

Tamil Nadu

9,724

11,559

19

Puducherry

206

218

6

Andaman and Nicobar Islands

87

92

5

Telangana

4,955

5,622

13

Andhra Pradesh

4,067

4,329

6

Ladakh

47

68

43

Other Territory

216

220

2

Center Jurisdiction

167

187

12

Grand Total

1,29,978

1,51,162

16

 

***

S.Patil/S.Chitnis/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1921275) Visitor Counter : 316