संरक्षण मंत्रालय
भारतीय हवाई दल प्रमुखांची श्रीलंकेला भेट
प्रविष्टि तिथि:
01 MAY 2023 2:08PM by PIB Mumbai
हवाई दल प्रमुख (CAS) एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी, आज श्रीलंकेच्या चार दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना झाले. या दौऱ्यात हवाई दल प्रमुख, श्रीलंकेचे राष्ट्रपती, श्रीलंकेचे पंतप्रधान, श्रीलंकेचे संरक्षणमंत्री, श्रीलंकेचे हवाई दल प्रमुख, श्रीलंकेचे हवाई दल, लष्कर आणि नौदलाचे कमांडर आणि संरक्षण सचिवांना भेटणार आहेत.
हवाई दल प्रमुख (CAS) एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी, श्रीलंकेच्या हवाई दलाचे कमांडर एअर मार्शल एस के पाथिराना यांच्या निमंत्रणावरून श्रीलंकेला भेट देत आहेत. या भेटीदरम्यान ते, श्रीलंकेतील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधतील आणि श्रीलंकेच्या हवाई दल अकादमीला भेट देतील. हवाई दल प्रमुखांच्या या भेटीमुळे दोन्ही देशांमधील विद्यमान व्यावसायिक संबंध आणि परस्पर सहकार्य वृद्धिंगत होईल.

***
S.Patil/B.Sontakke/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1921184)
आगंतुक पटल : 243