संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्ली येथे एससीओ संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर उझबेकिस्तान, बेलारूस आणि किर्गिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांसमवेत घेतल्या द्विपक्षीय बैठका

Posted On: 28 APR 2023 8:49PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 एप्रिल 2023

 

संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह यांनी उझबेकिस्तानचे संरक्षण मंत्री लेफ्टनंट जनरल बखोदिर कुर्बानॉव, बेलारूसचे संरक्षण मंत्री लेफ्टनंट जनरल व्हिक्टर ख्रेनिन आणि किर्गिस्तानचे संरक्षण मंत्री लेफ्टनंट जनरल बेकबोलोटोव्ह बी असांकालिविच यांच्यासोबत, शांघाय सहकार्य संघटनेच्या (संरक्षण संघ) च्या बैठकी दरम्यान  द्विपक्षीय बैठका घेतल्या.  आज 28 एप्रिल, 2023 रोजी नवी दिल्ली येथे झालेली मंत्र्यांची बैठक द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी परस्पर हिताचे सहयोग विस्तारित करण्यावर  लक्ष केंद्रित करणारी होती. या बैठकीदरम्यान तीन देशांसोबतच्या संरक्षण सहकार्याच्या संपूर्ण कार्यक्षेत्राचा  आढावा घेण्यात आला. तसेच परस्पर हिताच्या मुद्द्यांवरही चर्चा झाली.

एससीओचे सरचिटणीस झांग मिंग यांनी देखील एससीओ संरक्षण मंत्र्यांची बैठक पूर्ण झाल्यावर संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली. आपल्या अध्यक्षतेखाली भारताने राबविलेल्या विविध उपक्रमांवर चर्चा झाली.  राजनाथ सिंह यांनी महासचिवांना माहिती दिली की भारत एससीओच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी रचनात्मक योगदान देण्यासाठी वचनबद्ध आहे.

 

* * *

N.Chitale/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1920655) Visitor Counter : 144