गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत, नवी दिल्लीत भारत सरकार, आसाम सरकार आणि दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी /दिमासा पीपल्स सुप्रीम काऊंसिल (DNLA/DPSC)चे प्रतिनिधी यांच्यात, त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या
या करारान्वये, आसाममधील दिमा हसाओ जिल्ह्यातील बंडखोरी पूर्णपणे संपुष्टात येईल, या कराराद्वारे, आसाममधील सशस्त्र गटांच्या कारवाया पूर्णपणे बंद होतील; सर्व आदिवासी गट मुख्य प्रवाहात सामील होऊन भारताच्या विकास प्रक्रियेत योगदान देत आहेत.
Posted On:
27 APR 2023 9:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 एप्रिल 2023
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत, आज नवी दिल्लीत, भारत सरकार, आसाम सरकार आणि दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी /दिमासा पीपल्स सुप्रीम काऊंसिल (DNLA/DPSC)चे प्रतिनिधी यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा आणि केंद्रीय गृह मंत्रालय तसेच आसाम सरकारचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
हा करार, 2024 पर्यंत संपूर्ण ईशान्य भारत बंडखोरीमुक्त करण्यासाठी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शांततापूर्ण आणि समृद्ध ईशान्य भारताच्या संकल्पांची पूर्तता करण्याच्या दिशेने आणखी एक मैलाचा दगड आहे, असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले. या करारामुळे आसाममधील बंडखोरी पूर्णपणे संपुष्टात येईल असे सांगत, आज आसाममध्ये कोणतेही सशस्त्र गट नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली.
आजच्या करारामुळे आसाममधील दिमा हसाओ जिल्ह्यातील बंडखोरी पूर्णपणे संपुष्टात येईल. करारानुसार, आसाम सरकार दिमासा कल्याण परिषद स्थापन करेल, असेही त्यांनी सांगितले.
दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मीच्या, आत्मसमर्पण केलेल्या सशस्त्र युवांचे पुनर्वसन करण्यासाठी भारत सरकार आणि आसाम सरकारकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्याची तरतूदही या करारात असल्याची माहिती त्यांनी दिली. याच दृष्टिकोनातून एनसीएचएसीच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच इतर भागांमध्ये राहणार्या दिमासा लोकांसाठी भारत सरकार आणि आसाम सरकारकडून प्रत्येकी 500 कोटी रुपयांचे विशेष विकास पॅकेजही पाच वर्षांच्या कालावधीत टप्पाटप्याने प्रदान केले जाईल.
* * *
S.Kakade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1920355)
Visitor Counter : 166