आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीत प्रगती मैदान इथे सहाव्या ‘ॲडव्हांटेज हेल्थकेअर इंडिया 2023’ चे उद्घाटन करणार
दहा राज्यांचे आरोग्य मंत्री आणि आरोग्य अधिकाऱ्यांसह 70 देशातील सुमारे 500 व्यावसायिक या दोन दिवसीय संमेलनात सहभागी होण्याची अपेक्षा
Posted On:
25 APR 2023 4:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, म्हणजेच 26 एप्रिल, 2023 रोजी नवी दिल्लीत प्रगती मैदान इथल्या सहाव्या अॅडव्हांटेज हेल्थकेअर इंडिया 2023 चे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करणार आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया,सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग, त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील अनेक उच्चपदस्थ नेते आणि 10 देशांचे आरोग्य मंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) च्या सहकार्याने, भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या कारकीर्दीचा भाग म्हणून, एक पृथ्वी, एक आरोग्य या अंतर्गत, अॅडव्हांटेज हेल्थकेअर इंडिया 2023 चे ब्रँडिंग करण्याची जबाबदारी घेतली आहे. हा कार्यक्रम 26 आणि 27 एप्रिल 2023 या काळात नवी दिल्लीत प्रगती मैदानावर होणार आहे.
या दोन दिवसीय कार्यक्रमात, सर्व आकस्मिक संकटांचा सामना करु शकेल अशी चिवट जागतिक आरोग्य संरचना उभारण्यासाठी सहकार्य आणि भागीदारीच्या महत्वावर भर दिला जाईल. तसेच, उत्तम मूल्यांच्या आरोग्य सुविधांसह, वैश्विक आरोग्य व्यवस्थेचे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्याशिवाय, वैद्यकीय मूल्य पर्यटनात भारताची वाढलेली ताकद जगासमोर मांडणे, तसेच आरोग्यविषयक कार्यशक्तीचा निर्यातदार म्हणून भारत देत असलेल्या मूल्याधिष्ठित वैद्यकीय सेवा, आणि जागतिक दर्जाच्या आरोग्य तसेच निरामयता सेवांचे केंद्र म्हणून भारताचा झालेला उदय, हे ही या परिषदेत मांडण्यात येईल. हा कार्यक्रम भारताच्या ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या जी 20 अध्यक्षपदाच्या संकल्पनेशी सुसंगत आहे. त्याच अनुषंगाने कार्यक्रमाचे, “ एक पृथ्वी, एक आरोग्य, अॅडव्हांटेज हेल्थकेअर इंडिया 2023’ असे नाव ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या देशांसाठी, त्यातून, आरोग्यविषयक सहकार्याच्या संधी निर्माण होणार आहेत.
भारतातून सेवांची निर्यात होण्यास प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांना, ह्या आंतरराष्ट्रीय परिषदेतून, आपपल्या ज्ञानाचे आदानप्रदान करण्यासाठी एक आदर्श मंच उपलब्ध होईल. तसेच, जागतिक MVT उद्योगात कोणाकोणाचा सहभाग आहे आणि जगभरातील या क्षेत्रातल्या अधिकारी व्यक्ती, निर्णयकर्ते , उद्योग भागधारक, तज्ञ आणि उद्योगातील व्यावसायिक यांच्यातील कौशल्ये, हे सगळे अनुभवण्याची संधी इथे मिळू शकेल. याच क्षेत्रातील जगभरातल्या व्यक्तींशी संपर्क साधत, त्यांच्यामार्फत समव्यवसायिकांचे एक जाळे तयार करुन, कल्पनांची देवाणघेवाण संपर्क तयार करण्यास आणि एक भक्कम व्यावसायिक भागीदारी उभारण्याची संधी मिळेल.
या शिखर परिषदेत 125 प्रदर्शक आणि 70 देशांतील 500 प्रतिनिधी सहभागी होतील. आफ्रिका, मध्य पूर्व, राष्ट्रकूल, सार्क आणि आसियान या प्रदेशातील 70 हून अधिक नियुक्त देशांमधील प्रतिनिधींसोबत उलट स्वरूपातील विक्रेते आणि खरेदीदार यांची बैठक, B2B म्हणजेच व्यावसायिकांच्या- व्यवसायिकांशी बैठका आयोजित केल्या जातील.यामुळे भारतातील आरोग्यसेवा प्रदाते आणि परदेशी सहभागी एकाच मंचावर एकत्र येतील.
या शिखर परिषदेत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, पर्यटन मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, आयुष मंत्रालय, उद्योग मंच या क्षेत्रातील स्टार्टअप्स यातील प्रख्यात वक्ते आणि तज्ञांची चर्चा देखील आयोजित केली जाईल.
G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1919505)
Visitor Counter : 194