आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

मलेरिया निर्मूलनासाठी आशिया प्रशांत क्षेत्रातील नेत्यांची नवी दिल्ली येथे  24 एप्रिल रोजी परिषद

Posted On: 22 APR 2023 5:22PM by PIB Mumbai

 

जागतिक मलेरिया दिनाच्या निमित्ताने केंद्र सरकारचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय , एशिया पॅसिफिक लीडर्स मलेरिया अलायन्सच्या सहयोगाने  नवी दिल्ली येथे 24 एप्रिल 2023 रोजी आशिया प्रशांत क्षेत्रातील नेत्यांची मलेरिया निर्मूलनाबाबत परिषद आयोजित करत आहे.केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच रसायने आणि खते मंत्री मनसुख मांडवीय यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद होणार आहे. वर्ष 2030 पर्यंत मलेरियाचे निर्मूलन करण्याच्या प्रयत्नांना  गती  देण्याप्रति  कटीबद्धता अधिक मजबूत करणे हे या परिषदेचे उद्दिष्ट  आहे.

या परिषदेमुळे आशिया प्रशांत क्षेत्रातील नेत्यांना मलेरिया निर्मूलनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नाबद्दल चर्चा करण्यासाठी व्यासपीठ मिळेल, तसेच वर्ष 2030 पर्यंत आशिया प्रशांत क्षेत्र मलेरियामुक्त करण्याच्या उद्देशाने काम करत असणाऱ्या सर्व राष्ट्रीय तसेच स्थानिक उपक्रमांना चालना मिळेल.

या परिषदेतील सत्रांमध्ये राष्ट्रीय आणि स्थानिक प्रगतीचा आढावा , मलेरियाचा धोका जास्त असणाऱ्या लोकांपर्यंत पोहचणे , मलेरिया निर्मूलनासाठी  संशोधन , शोध आणि नवीन तंत्रज्ञानाला चालना देऊन प्रगतीचा वेग वाढवणे, तसेच  संपूर्णपणे शासकीय दृष्टिकोनाचा अवलंब आदी विषयांचा समावेश असेल.

***

S.Kane/V.Sahajrao/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1918800) Visitor Counter : 190