रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
पर्वतमाला परियोजनेअंतर्गत 5 वर्षांत रोपवेसह 1,200 किमीपेक्षा अधिक लांबीचे 250 हून अधिक प्रकल्प विकसित करण्याची सरकारची योजना - नितीन गडकरी
Posted On:
19 APR 2023 3:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 एप्रिल 2023
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज ऑस्ट्रियातील इन्सबर्क येथे अल्पाइन तंत्रज्ञानासाठी अग्रगण्य असणाऱ्या 'इंटरलपिन (INTERALPIN) 2023 फेअर' या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याला संबोधित केले.हा मेळावा प्रमुख उद्योजक , सेवा प्रदाते आणि केबल कार उद्योगातील निर्णय घेणाऱ्यांना एकत्र आणतो.
“पर्वतमाला परियोजना” अंतर्गत, भारत सरकार 5 वर्षांमध्ये रोपवेसह 1,200+ किमी लांबीचे 250+ प्रकल्प विकसित करण्याची योजना आखत आहे, असे गडकरी यांनी सांगितले. भारत सरकारच्या 60% योगदान समर्थनासह हायब्रीड अॅन्युइटी मॉडेल अंतर्गत सार्वजनिक खाजगी भागीदारीवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही "मेक इन इंडिया" उपक्रमांतर्गत रोपवे संबंधित उत्पादनांच्या निर्मितीला प्रोत्साहन देत आहोत, असे ते म्हणाले.
शाश्वत आणि सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी , विद्यमान रोपवे मानकांच्या वाढीमध्ये सहभागी होण्यासाठी आणि भारतीय पायाभूत सुविधांना अधिक उंचीवर नेत असताना या परिवर्तनाच्या प्रवासाचा एक भाग बनण्यासाठी आम्ही ऑस्ट्रियन आणि युरोपियन उद्योगांना प्रोत्साहित करत आहोत, असे गडकरी यांनी सांगितले.
सुखावह आणि पर्यावरण पूरक रोपवे प्रवासी वाहतुकीचा मार्ग मोकळा करणाऱ्या उच्च तंत्रज्ञान उपायोजन, नाविन्यपूर्ण डिझाइन, उत्कृष्ट दर्जा आणि कार्यक्षमता प्रदान करणाऱ्या रोपवे यंत्रणेच्या जगातील आघाडीच्या उत्पादकांच्या प्रदर्शनांनाही गडकरी यांनी भेट दिली.
G.Chippalkatti/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1917881)
Visitor Counter : 211