कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
" 2023 मधला युवा वर्ग 2047 मधील भारताचा चेहरा ठरवणार " - केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह
शांतता-निर्मिती आणि सलोखा : युद्ध नसलेल्या युगाची सुरुवात या विषयावरील युथ 20 विचारविनिमय कार्यक्रमाला डॉ जितेंद्र सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित
Posted On:
19 APR 2023 1:28PM by PIB Mumbai
2023 मधला युवा वर्ग 2047 मधील भारताचा चेहरा ठरवणार आहे , असे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री , डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले.
जम्मू विद्यापीठात आयोजित शांतता-निर्मिती आणि सलोखा : युद्ध नसलेल्या युगाची सुरुवात या विषयावरील युथ 20 विचारविनिमय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तीन पिढ्या उलटल्या आहेत आणि आपल्याकडे प्रतिभा किंवा क्षमतांची कमतरता नव्हती मात्र पोषक वातावरणाची कमतरता होती ही कमतरता दूर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता हे अनुकूल वातावरण उपलब्ध करून दिले आहे,. त्यामुळे आता ही एक उत्तम संधी निर्माण झाली आहे पण त्याचबरोबर एक आव्हान आणि विशेष फायदा देखील आहे कारण हाच युवा वर्ग आता भारत@2047 चा चेहरा ठरवणार आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले. आज जे तिशीत आहेत तेच त्यावेळी महत्वाचे नागरिक असतील, असे ते म्हणाले. मे 2014 मध्ये सरकार स्थापन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, हे सरकार गरीबांच्या उत्थानासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि तरुणांच्या उन्नतीसाठी समर्पित असेल, असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
सुरुवातीपासूनच पंतप्रधान मोदी यांनी तरुणांशी संबंधित मुद्दे आणि समस्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.तरुणांसाठी उपजीविकेची साधने , सरकारी नोकऱ्या आणि उत्पन्नासाठी नवीन मार्ग आणि संधी निर्माण करण्यासाठी पंतप्रधान सातत्याने प्रयत्नशील आहेत, असे त्यांनी सांगितले.
युथ 20 हा जी 20 च्या अंतर्गत असलेल्या आठ अधिकृत कार्य गटांपैकी एक आहे. जी 20 सदस्य देशांची सरकारे आणि तिथले स्थानिक तरुण यांच्यात दुवा निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.2023 मधील वाय 20 इंडिया समिट भारताच्या युवा-केंद्रित प्रयत्नांचे उदाहरण प्रस्थापित करेल आणि जगभरातील तरुणांना त्यांची मूल्ये आणि धोरणात्मक उपाय सादर करण्याची संधी देईल, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
***
Jaidevi PS/SBC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1917861)
Visitor Counter : 193