पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना 21 एप्रिल रोजी करणार मार्गदर्शन
राष्ट्र उभारणीसाठी प्रोत्साहनपर पंतप्रधानांचा कार्यक्रम;नागरी सेवा दिनाचे औचित्य साधून देशभरातील नागरी सेवकांना प्रेरित करण्यासाठी हा कार्यक्रम एक योग्य व्यासपीठ म्हणून करणार काम
पंतप्रधानांच्या हस्ते सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी ‘पंतप्रधान पुरस्कार’ करणार प्रदान
Posted On:
18 APR 2023 8:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 एप्रिल 2023
राष्ट्रीय नागरी सेवा दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवन, येथे नागरी सेवा अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
राष्ट्र उभारणीसाठी नागरी सेवेतील अधिकारी देत असलेल्या योगदानाचे पंतप्रधानांनी नेहमीच कौतुक केले आहे. तसेच त्यांना आणखी कठोर परिश्रम करण्यासाठी प्रोत्साहनही दिले आहे. देशभरातील नागरी सेवकांना प्रेरित करण्यासाठी हा कार्यक्रम एक योग्य व्यासपीठ म्हणून काम करेल.विशेषत: अमृत कालच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यात, जेणेकरून ते त्याच उत्साहाने ते देशाची सेवा करीत राहतील.या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या जिल्हा आणि संघटनांनी केलेल्या असामान्य आणि नाविन्यपूर्ण कार्याची ओळख व्हावी, या उद्देशाने हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
यावेळी चिन्हीत करण्यात आलेल्या चार महत्वपूर्ण आणि प्राधान्य असलेल्या कार्यक्रमांमध्ये केलेल्या अनुकरणीय कार्यांना पुरस्कार दिले जातील: हर घर जल योजनेच्या माध्यमातून स्वच्छ जलला प्रोत्साहन देणे; आरोग्य आणि कल्याण केंद्रांद्वारे आरोग्यदायी भारताचा प्रचार करणे; समग्र शिक्षणाद्वारे समतापूर्ण आणि सर्वसमावेशक वर्गातील वातावरणासह दर्जेदार शिक्षणाला प्रोत्साहन देणे; आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाद्वारे सर्वांगीण विकास - संपृक्तता दृष्टिकोनावर विशेष लक्ष केंद्रित करून सर्वांगीण प्रगती. अशा चार चिन्हीत केलेल्या कार्यक्रमांसाठी आठ पुरस्कार दिले जाणार आहेत. तसेच सात पुरस्कार नवकल्पनांसाठी देण्यात येणार आहेत.
G.Chippalkatti/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1917764)
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam