अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या G20 अध्यक्षतेखाली G20 देशांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यांची दुसरी बैठक संपन्न

Posted On: 14 APR 2023 9:10AM by PIB Mumbai

 

भारताच्या अध्यक्षतेखाली दुसरी G20 देशांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर्स (FMCBG) यांची दुसरी बैठक 1213 एप्रिल 2023 रोजी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक समूह  यांच्या 2023 च्या वासंतीक बैठकीदरम्यान  झाली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास  हे या बैठकीच्या संयुक्त अध्यक्षपदी होते. या बैठकीत G20 सदस्य  देश, तेरा आमंत्रित देश आणि विविध आंतरराष्ट्रीय तसेच प्रादेशिक संस्थांचे जवळपास 350 प्रतिनिधी  हजर होते.

ही बैठक तीन सत्रात आयोजित केली होती. ही सत्रे जागतिक अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय वित्तीय आराखडा , शाश्वत निधीवित्तक्षेत्र ,वित्तीय समावेशन आणि आंतरराष्ट्रीय करप्रणाली यांच्यावर आधारित होती.

फेब्रुवारीत झालेल्या G20 FMCBG  मंत्री तसेच गव्हर्नर्सच्या बैठकीचा अध्यक्षीय सारांश आणि बैठकीच्या फलनिष्पत्तीविषयीचा दस्तऐवज यामधून निघालेल्या गोषवाऱ्यामधून  G20 वित्तीय ट्रॅक वरील विविध कार्य प्रणालीत झालेल्या प्रगतीबाबत विचारविनिमय   करणे हे या बैठकीचे उद्दिष्ट होते.

जागतिक अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक आराखडा या सत्रात सहभागींनी जागतिक अर्थ व्यवस्थेत असलेली प्रमुख आव्हाने म्हणजेच युक्रेनमधील युद्ध ,अन्न तसेच ऊर्जा संबंधी असुरक्षा, हवामान बदल आणि वित्तीय स्थैर्यासंबंधीची आत्ताची आव्हाने यावर या बैठकीत चर्चा झाली. G20 राष्ट्रगट हा जागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करणे आणि त्याद्वारे त्याचा फटका सर्वात जास्त बसणार असलेल्या देशांना व लोकसंख्येला आश्वस्त करणे या दृष्टीने सर्वसमावेशक सर्व मान्य वातावरण घडवून शकेल यावर सर्व सदस्यांचे एकमत झाले.

बहुस्तरीय विकास बँकांचे स्वतंत्र पॅनेल तसेच भांडवल पर्याप्तता फ्रेमवर्कने केलेल्या प्रस्तावांच्या अंमलबजावणीतील प्रगतीवर मंत्री तसेच गव्हर्नर्सनी चर्चा केली. आत्ताच निर्माण केलेल्या G20 तज्ञ समितीने बहुस्तरीय विकास बँकांच्या बळकटीकरणाबाबतच्या आपल्या अपेक्षाही त्यांनी सामायिक केल्या.

कर्जाच्या बाबतीत कमी किंवा मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये वाढत्या कर्जाच्या संकटाला तोंड देण्यासाठी बहुस्तरीय सहयोग मजबूत करण्यावर प्रामुख्याने चर्चा झाली.  सामान्य आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या कर्जाच्या प्रक्रिया तत्परतेने पूर्ण करण्याच्या गरजांचा पुनरुच्चार मंत्री तसेच गवर्नसनी केला . निधी पुरवठ्यावर हवामान संबंधीच्या धोरणाचा परिणाम होत असल्याबाबतही चर्चा झाली.

शाश्वत निधी, अर्थक्षेत्र आणि आर्थिक समावेशन या विषयावरील दुसऱ्या सत्रात हवामान बदलाशी सामना करण्यासाठी संसाधने उपलब्ध करून देणे, शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी खाजगी निधी मिळवून देण्यातील बहुपक्षीय  आर्थिक संस्थांची  सहाय्यकारी भूमिका, सामाजिक उद्दिष्टे साधणारी गुंतवणूक उभी करण्यात G20 ची प्रोत्साहनपर भूमिका यावर चर्चा झाली.

तिसरे सत्र आंतरराष्ट्रीय कर प्रणालीवर होते.   द्विस्तंभीय आंतरराष्ट्रीय कर पॅकेजचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार  होण्यासाठी तसेच त्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने या सत्रात चर्चा झाली.

दुसऱ्या  G20 FMCBG बैठकीत चर्चिल्या गेलेल्या मुद्द्यांच्या प्रगतीवर  जुलै 2023 मध्ये भारतात गांधीनगर येथे होणार असलेल्या  तिसऱ्या G20 FMCBG बैठकीत चर्चा होईल.

***

N.Chitale/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1916690) Visitor Counter : 338