राष्ट्रपती कार्यालय
वैशाखी, विशू, रोंगाली बिहू, नबवर्ष, वैशाखादी आणि पुथंडु पिरप्पूच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींच्या शुभेच्छा
Posted On:
13 APR 2023 7:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 एप्रिल 2023
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 14 आणि 15 एप्रिल 2023 रोजी साजऱ्या होणाऱ्या वैशाखी, विशू, रोंगाली बिहू, नब वर्ष, वैशाखादी आणि पुथंडू पिरप्पूच्या पूर्वसंध्येला आपल्या संदेशात म्हटले आहे:-
“वैशाखी, विशू, रोंगाली बिहू, नब वर्ष, वैशाखादी आणि पुथंडू पिरापूच्या शुभ प्रसंगी, देश-विदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना मी मनःपूर्वक शुभेच्छा देते आणि अभिष्ट चिंतन करते.
आपल्या देशाच्या विविध भागात साजरे होणारे हे शेतकरी सण भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची आणि विविधतेची झलक दाखवतात. आनंद, समृद्धी आणि प्रगतीचे उत्सव असणारे हे सण आपल्या अन्नदाता शेतकऱ्यांच्या कठोर परिश्रमाचे प्रतीक आहेत. हे सण म्हणजे त्यांच्या मेहनतीचा आदर करण्याचाही एक पर्व आहे.
हे आनंदी सण आपल्याला आपल्या राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी आणि आपल्या सहकारी नागरिकांमध्ये सामंजस्याची भावना पसरवण्यासाठी प्रेरणा देतील, अशी मला आशा आहे.”
राष्ट्रपतींचा संदेश हिंदीत पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1916328)
Visitor Counter : 186