मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

मत्स्य,पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला उद्या 'राष्ट्रीय एक-आरोग्य अभियाना' अंतर्गत “अ‍ॅनिमल पॅन्डेमिक प्रिपेडनेस इनिशिएटिव्ह (APPI)” चे लोकार्पण करणार


पशुसंवर्धन विभाग चांगल्या पशु आरोग्य व्यवस्थापन प्रणालीसाठी एक परिसंस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने जागतिक बँकेसोबत पशु आरोग्य प्रणाली 'सपोर्ट फॉर वन हेल्थ'(AHSSOH)वर एक सहयोगी प्रकल्प तयार करणार

महाराष्ट्रासह पाच सहभागी राज्यांमधील 151 जिल्ह्यात हा प्रकल्प राबविण्याचे उद्दिष्ट

75 जिल्हा /प्रादेशिक प्रयोगशाळा, 300 पशुवैद्यकीय रुग्णालये/ उपचार केंद्रांचे अद्यतनीकरण /बळकटीकरण, 9000 पॅरा-पशुवैद्य/ निदान व्यावसायिक तसेच,5500 पशुवैद्यकीय व्यावसायिकांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट

Posted On: 13 APR 2023 1:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2023

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला राष्ट्रीय एक-आरोग्य मिशन अंतर्गत अ‍ॅनिमल पॅन्डेमिक प्रिपेडनेस इनिशिएटिव्ह (एपीपीआय) तसेच जागतिक बँकेकडून अर्थसहाय्यित 'अ‍ॅनिमल हेल्थ सिस्टम सपोर्ट फॉर वन हेल्थ' (एएचएसएसओएच) प्रकल्पाचा प्रारंभ करणार आहेत. हा कार्यक्रम उद्या 14 एप्रिल 2023 रोजी इंडिया हॅबिटॅट सेंटर, नवी दिल्ली येथे होणार आहे.

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाने एक आरोग्य पध्दतीचा वापर करून पशु आरोग्य व्यवस्थापन प्रणालीसाठी एक परिसंस्था तयार करण्याच्या उद्देशाने 'वन हेल्थ'साठी पशु आरोग्य प्रणाली सहाय्य (AHSSOH) वर काम करण्यासाठी एका सहयोगी प्रकल्पावर स्वाक्षरी केली आहे. हा प्रकल्प पाच राज्यांमध्ये राबविण्यात येणार असून पशु आरोग्य व रोग व्यवस्थापनाशी संबंधित भागधारकांची क्षमता वाढवण्यासाठी या प्रकल्पाची रचना करण्यात आली आहे. या प्रकल्पात सामुदायिक सहभागासह 'वन हेल्थ आर्किटेक्चर' तयार करणार; ते मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय, प्रादेशिक तसेच स्थानिक पातळीवर मानवी आरोग्य, वन व पर्यावरण विभागाच्या सहभागाची आवश्यकता आहे.

पाच सहभागी राज्यांमधील (आसाम, ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र) 151 जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबविण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पात 75 जिल्हा/ प्रादेशिक प्रयोगशाळांचे अद्यतनीकरण, 300 पशुवैद्यकीय रुग्णालये/ उपचार केंद्रांचे अद्यतनीकरण /सशक्तीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. 9000 पॅरा-व्हेटेरिनरी /निदान व्यावसायिक आणि 5500 पशुवैद्यकीय व्यावसायिकांना प्रशिक्षित करण्याचे देखील उद्दीष्ट आहे. या व्यतिरिक्त, सहा लाख घरांपर्यंत पोहोचून 'झुनोटिक' (प्राण्यांपासून मानवाला होणारे रोग) व साथीच्या रोगापासून बचाव करण्यासाठी समुदाय स्तरावर जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे.

1228.70 कोटी रुपये आर्थिक तरतुदीचा हा सहयोगी प्रकल्प पाच वर्षांच्या कालावधीत केंद्रीय क्षेत्र योजना म्हणून राबविण्यात येईल. या व्यतिरिक्त हा प्रकल्प पशुवैद्य व सहाय्यक -पशुवैद्यकांना नाविन्यपूर्ण रोग व्यवस्थापन पद्धतींबद्दल सतत प्रशिक्षण देण्यासाठी एक परिसंस्था विकसित करेल, शिवाय नेटवर्किंग प्रयोगशाळा तसेच 'झुनोटिक' व इतर प्राण्यांच्या रोगांवर वर्धित पाळत ठेवण्यासाठी एकात्मिक रोग अहवाल प्रणाली विकसित करेल. या मूलभूत उपक्रमांमुळे प्राण्यांवर घातक परिणाम करणाऱ्या साथीच्या रोगांविरोधात सज्ज राहण्यास मदत होईल.

प्राण्यांच्या साथीच्या रोगांविरोधात भविष्यात सज्ज असणे, हे राष्ट्रीय एक आरोग्य अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आगामी राष्ट्रीय एक आरोग्य मिशनचा एक भाग म्हणून, विभागाने भविष्यातील प्राण्यांच्या साथींच्या रोगांसाठी अ‍ॅनिमल पॅन्डेमिक प्रिपेडनेस इनिशिएटिव्ह (APPI) ची एक केंद्रित आराखडा तयार केला आहे. APPI अंतर्गत ज्या प्रमुख क्रिया अंमलबजावणीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत:

  1. परिभाषित संयुक्त तपास व उद्रेक प्रतिसाद गट (राष्ट्रीय व राज्य)
  2. संपूर्ण एकात्मिक रोग निरीक्षण प्रणालीची रचना करणे (राष्ट्रीय डिजिटल पशुधन मिशनवर आधारित)
  3. नियामक प्रणाली मजबूत करणे (उदा. नंदी ऑनलाइन पोर्टल व क्षेत्र चाचणी मार्गदर्शक तत्त्वे)
  4. रोग मॉडेलिंग अल्गोरिदम व पूर्व सूचना प्रणाली तयार करणे.
  5. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासह आपत्ती निवारणाचे धोरण आखणे.
  6. प्राधान्यक्रमित रोगांसाठी लस /निदान/ उपचार प्रणाली विकसित करण्यासाठी लक्ष्यित संशोधन व विकास यंत्रणा सुरू करणे.
  7. रोग शोधण्याची अद्यतनित तसेच त्या चाचणीची संवेदनशीलता सुधारण्यासाठी जनुकीय व पर्यावरणीय पाळत ठेवण्याच्या पद्धती तयार करणे.  

 

S.Pophale/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1916147) Visitor Counter : 261