रेल्वे मंत्रालय
रेल्वे सुरक्षा दल (आर पी एफ) मध्ये उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबलच्या 9000 पदांसाठीच्या भर्ती बद्दल स्पष्टीकरण
प्रविष्टि तिथि:
11 APR 2023 6:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 एप्रिल 2023
रेल्वे सुरक्षा दल (आर पी एफ) मध्ये उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबलच्या 9000 पदांच्या भर्तीबाबत समाज माध्यमे आणि मुद्रित माध्यमांमध्ये चुकीचा संदेश प्रसारित केला जात आहे.
सर्व संबंधितांच्या मार्गदर्शनासाठी सूचित केले जाते की रेल्वे सुरक्षा दल (आर पी एफ) किंवा रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा कोणत्याही मुद्रित किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे अशी कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही.
S.Patil/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1915684)
आगंतुक पटल : 238