आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांची राम मनोहर लोहिया (आरएमएल) रुग्णालयाला भेट, कोविड-19 व्यवस्थापनासाठी रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांची कोविड सज्जता सुनिश्चित करण्यासाठीच्या मॉक ड्रिलचा घेतला आढावा
प्रत्येकाला कोविड प्रतिबंधक वर्तनाचे अनुकरण करण्याचे आणि कोणत्याही चुकीच्या माहितीला आळा घालण्याचे आवाहन
Posted On:
10 APR 2023 6:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 एप्रिल 2023
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्ली येथील राम मनोहर लोहिया (आरएमएल) रुग्णालयाला भेट दिली आणि कोविड-19 व्यवस्थापनासाठी रुग्णालयाची कार्यान्वयन सज्जता सुनिश्चित करण्यासाठी हाती घेतलेल्या मॉक ड्रिलचा आढावा घेतला.

डॉ. मनसुख मांडवीय यांच्या ट्विट संदेशात ते सुविधांची पाहणी करताना आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना दिसतात.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी देशातील कोविड-19 स्थिती आणि प्रतिबंध आणि व्यवस्थापनाच्या सज्जतेसाठी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. भविष्यात कोणताही उद्रेक झाल्यास त्याची सज्जता सुनिश्चित करण्यासाठी देशभर मॉक ड्रिल आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणून, आज सरकारी तसेच खासगी रुग्णालये मॉक ड्रिल घेत आहेत आणि राज्यांचे आरोग्य मंत्री आपापल्या राज्यांमध्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्याचा आढावा घेत आहेत.

आरएमएल रुग्णालयाला भेट देताना डॉ. मांडवीय यांनी विभागप्रमुख आणि कर्मचारी यांच्याशी अनौपचारिक संवाद साधला. त्यांनी डॉक्टर, परिचारिका, सुरक्षा आणि स्वच्छता सेवा प्रमुखांच्या बहुमोल सूचना ऐकत त्याच्यासोबत काही वेळ व्यतीत केला. दर्जेदार उपचार पद्धती, संसर्ग नियंत्रणासाठी उपाय, रुग्णालय व्यवस्थापन, स्वच्छता प्रक्रिया आणि रुग्ण-केंद्रित तरतुदींचा या सूचनांमध्ये समावेश होता.
मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालये आणि सुविधांच्या तयारी आणि क्षमतेचा आढावा घेतला असून देशभरात यासाठी अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्यांना सतर्क राहण्याचा आणि कोविड 19 व्यवस्थापनासाठी सर्व सज्जता ठेवण्याच्या सूचना याआधीच दिल्या आहेत.
* * *
N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1915396)
Visitor Counter : 179