पंतप्रधान कार्यालय
देशांतर्गत उत्पादित गॅस मूल्यनिर्धारण विषयक मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
07 APR 2023 11:19AM by PIB Mumbai
आंतरराष्ट्रीय बाजारातल्या गॅसच्या वाढलेल्या किमतींचा भारतातल्या गॅसच्या किंमतींवर होणारा परिणाम कमी करून ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केलेलं ट्विट सामायिक करून पंतप्रधान ट्विटच्या माध्यमातून म्हणाले की:-
“देशांतर्गत उत्पादित गॅस मूल्यनिर्धारण विषयक मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा करण्याशी संबंधित मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे ग्राहकांना अनेक लाभ मिळणार आहेत. या क्षेत्राच्या विकासासाठी ही सकारात्मक घडामोड आहे.”
***
N.Chitale/S.Naik/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1914644)
आगंतुक पटल : 227
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam