आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दिब्रुगडमधील योग महोत्सवाला उत्तम प्रतिसाद

Posted On: 07 APR 2023 12:19PM by PIB Mumbai

 

आंतरराष्ट्रीय योग दिनास 75 दिवस बाकी असल्याची आठवण म्हणून दिब्रुगढ विद्यापीठाच्या मैदानावर आज योग महोत्सवसाजरा करण्यात आला. हजारो लोकांच्या सहभागाने यशस्वी झालेल्या या महोत्सवात योग सराव (सीवायपी) करण्यात आला.

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल;  त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉ माणिक साहाअरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री चौना मेंकेंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री आणि दिब्रुगडचे खासदार  रामेश्वर तेलीकेंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंहआसामचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, केशब महंतामाजी मंत्री आणि हाऊसफेडचे अध्यक्ष भाबेश कलितामणिपूरचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री सपम रंजन सिंगमेघालयचे ऊर्जा मंत्री ए टी मंडलदिब्रुगड विद्यापीठाचे कुलगुरू प्रा जितेन हजारिकाआणि आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा या कार्यक्रमाला उपस्थित होते.

दिब्रुगढच्या निसर्गरम्य वातावरणात या अद्भुत योग महोत्सवाचेआयोजन ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे असे केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यावेळी म्हणाले. तुम्ही हजारोंच्या संख्येने यात सहभागी झालात. यामुळे, योगाला आरोग्यदायी आणि उत्तम उद्याची जागतिक चळवळ बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दृष्टीकोनाला पाठबळ मिळत आहे असे ते म्हणाले.

या शुभ जागतिक आरोग्य दिनी साजऱ्या होत असलेल्या योग महोत्सवाच्या या पवित्र प्रसंगी, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, आयुष मंत्रालय दिब्रुगढ येथे 100 खाटांचे योग आणि निसर्गोपचार रुग्णालय उभारणार आहे असे आयुष मंत्री, सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले. यामुळे दिब्रुगडला या प्रदेशातील आरोग्यसेवेचे केंद्र म्हणून अधिक बळ मिळणार आहे. ईशान्येतील अशा एकमेव केंद्राला पूर्ण पाठिंबा दिल्याबद्दल मी आसामचे मुख्यमंत्री डॉ हिमंता बिस्वा सरमाजी यांचा आभारी आहे.  हे केंद्र आसाममधील लोकांना योग आणि निसर्गोपचार बाह्य आणि आंतररुग्ण उपचार देऊन प्रदेशाच्या गरजा पूर्ण करेल असे ते म्हणाले.

मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था (एमडीएनआयवाय) आणि दिब्रुगढ विद्यापीठ यांच्यात योगाभ्यासकांची परिसंस्था विकसित करण्यासाठी सामंजस्य करार देखील करण्यात आला. यामुळे योग हा प्रत्येकाच्या निरोगी जीवनशैलीचा एक भाग बनवण्याच्या आपल्या वचनबद्धतेला आणखी बळकटी मिळेल.

***

S.Thakur/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1914588) Visitor Counter : 177