पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पर्यटन मंत्रालयाद्वारे, देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर प्रचार मोहिमा राबवून भारतातील सप्त मोक्ष पुरी स्थळांना प्रोत्साहन

Posted On: 07 APR 2023 9:10AM by PIB Mumbai

पर्यटन मंत्रालय भारतातील पर्यटन स्थळांना सर्वंकष दृष्टीकोनातून प्रोत्साहन देते. यात आता अयोध्या, मथुरा, माया (हरिद्वार), काशी (वाराणसी), कांची अवंतिका (उज्जैन), पुरी (  ओडिशा) आणि द्वारवती (द्वारका, गुजरात) या सप्त मोक्ष पुरी स्थळांचाही आता यात समावेश आहे. देशातील विविध पर्यटन स्थळे आणि उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक, मुद्रीत आणि डिजिटल माध्यमांद्वारे देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठांमध्ये प्रचार मोहिमा राबवल्या जात आहेत. त्यानंतर अधिकृत संकेतस्थळ तसेच मंत्रालयाच्या समाजमाध्यम हँडलद्वारे  जाहिरात देखील केली जाते.

संबंधित राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांशी सल्लामसलत करून निवडलेल्या तीर्थक्षेत्रे आणि वारसा स्थळांच्या एकात्मिक विकासाच्या उद्देशाने "राष्ट्रीय तीर्थक्षेत्र कायाकल्प आणि अध्यात्मिक, वारसास्थळ विकास अभियान (प्रसाद)" योजनेअंतर्गत पर्यटन मंत्रालय आर्थिक सहाय्य प्रदान करते. 

पर्यटनाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी स्वदेश दर्शन अंतर्गत आर्थिक मदतही केली जाते. स्थळांची निवड करणे हा मुख्यत्वे राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेश प्रशासनाचा विशेषाधिकार आहे. निधीची उपलब्धता, योग्य तपशीलवार प्रकल्प अहवाल सादर करणे, योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे, यापूर्वी जारी केलेल्या निधीचा वापर, इत्यादींच्या अधीन राहून प्रकल्पांना मंजुरी दिली जाते. शाश्वत आणि जबाबदार पर्यटन स्थळांच्या विकासासाठी स्वदेश दर्शन योजना एसडी 2.0 मध्ये सुधारित करण्यात आली असून  एसडी 2.0 अंतर्गत विकासासाठी द्वारकाची निवड केली आहे.

सांस्कृतिक, पर्यटन आणि उत्तर-पूर्व विकास विभागाचे मंत्री जी किशन रेड्डी यांनी काल राज्यसभेत हे उत्तर दिले.

***

Smarjeet T/Vinayak/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1914547) Visitor Counter : 215