पोलाद मंत्रालय

मँगनिज ओर इंडिया लिमिटेडने 2022-23 या आर्थिक वर्षात आपल्या स्थापनेपासून दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च उत्पादनाची केली नोंद

Posted On: 03 APR 2023 5:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 एप्रिल 2023

 

एमओआयएल म्हणजेच मँगनिज ओर इंडिया लिमिटेडने 2022- 23 या  आर्थिक वर्षात 13.02 लाख टन मॅंगनीज  धातूपाषाणाचे उत्पादन केले आहे.गेल्या वर्षाच्या तुलनेत 6 % वाढ नोंदवत या संस्थेच्या स्थापनेपासून हे  दुसरे सर्वोच्च उत्पादन नोंदवले आहे. आर्थिक वर्ष 23 मध्ये 245 कोटी रूपये   भांडवली खर्च संस्थेने केला आहे.  हा खर्च  आर्थिक वर्ष 2021-22 मधील खर्चापेक्षा 14% जास्त आहे.

एमओआयएलचे मुख्‍य व्यवस्थापकीय संचालक अजित कुमार सक्सेना यांनी या कामगिरीबद्दल एमओआयएलचे  अभिनंदन केले आहे. आगामी वर्षात विक्रमी उत्‍पादनाचे नवनवीन टप्पे गाठण्‍यासाठी एमओआयएल सिद्ध आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासाठी योग्य प्रकारे नीतीधोरण आणि कृती आराखडा दृढतेने राबविण्‍यात येईल, असे त्यांनी सांगितले.

एमओआयएलविषयी माहिती :- एमओआयएल ही भारत सरकारच्या पोलाद मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली एक परिशिष्‍ट-ए, मिनीरत्न श्रेणी-I सीपीएसई आहे. एमओआयएल ही देशातील मॅंगनीज धातूची सर्वात मोठी उत्पादक आहे, जी देशांतर्गत उत्पादनात  45% योगदान देते. या संस्‍थेमार्फत  महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यात अकरा खाणी चालविण्‍यात येतात.  2030 पर्यंत कंपनीचे उत्पादन दुप्पट करून, ते 3.00 दशलक्ष टनांपर्यंत नेण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. एमओआयएलच्यावतीने  गुजरात, राजस्थान, छत्तीसगड आणि ओडिशा राज्यात व्यवसायाच्या संधींचा  शोध घेतला जात आहे.

 

* * *

N.Chitale/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1913361) Visitor Counter : 159


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi , Telugu