सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

1.04.2023 पासून सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी पत हमी योजनेची पुनर्रचना


सीजीटीएमएसईने 1 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी वार्षिक हमी शुल्क वार्षिक 2% या सर्वोच्च दरावरून 0.37% पर्यंत कमी करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

हमीसाठी कमाल मर्यादा 2 कोटी रुपयांवरून वाढवून 5 कोटी रुपये करण्यात आली

Posted On: 31 MAR 2023 1:58PM by PIB Mumbai

 

केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये, केंद्रीय वित्त मंत्री  निर्मला सीतारामन यांनी सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी 1.04.2023 पासून पत हमी योजनेची पुनर्रचना करण्याची घोषणा केली, ज्यामध्ये 2 लाख कोटी रुपये अतिरिक्त तारण - मुक्त हमी कर्ज देता यावे यासाठी निधीमध्ये 9,000 कोटी रुपयांची भर घालण्यात येणार आहे तसेच कर्ज संबंधी खर्चात  सुमारे 1 टक्क्यांनी कपात होईल.

या अनुषंगाने , पुढील  महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत:

  • क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रायझेस (सीजीटीएमएसई) च्या एकूण निधीमध्ये 30.03.2023 रोजी 8,000 कोटी रुपयांची भर घालण्यात आली.
  • सीजीटीएमएसईने 1 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी वार्षिक हमी शुल्क वार्षिक 2% च्या  सर्वोच्च पातळीवरून 0.37% पर्यंत कमी करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामुळे सूक्ष्म आणि लघु उद्योगांचा कर्जासाठी होणारा एकूण खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल.
  • हमीची कमाल मर्यादा 2 कोटी रुपयांवरून वाढवून 5 कोटी रुपये करण्यात आली आहे.
  • 10 लाख रुपयांपर्यंतच्या थकित कर्जाच्या हमीसंदर्भात दाव्यांचा निपटारा करण्यासाठी आता यापुढे कायदेशीर कार्यवाही सुरू करण्याची आवश्यकता नाही.
  • सीजीटीएमएसईने आर्थिक वर्ष 2022 - 23 दरम्यान 1 लाख कोटी रुपये मूल्याची हमी मंजूर करण्याचा मैलाचा  टप्पा गाठून ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे.

***

S.Tupe/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1912654) Visitor Counter : 178