ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

40,000 हून अधिक अमृत सरोवर देशाला समर्पित – भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाची महत्त्वपूर्ण कामगिरी

Posted On: 31 MAR 2023 11:28AM by PIB Mumbai

 

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात, 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, पंतप्रधानांनी 24 एप्रिल 2022 रोजी देशाच्या ग्रामीण भागातील पाण्याच्या संकटावर मात करण्याच्या उद्देशाने देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 अमृत सरोवर बांधण्याचे/पुनरुज्जीवीत करण्याचे ध्येय ठेवून मिशन अमृत सरोवर सुरू केले होते.

15 ऑगस्ट 2023 पर्यंत 50,000 अमृत सरोवरांचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. 11 महिन्यांच्या अल्प कालावधीत, आतापर्यंत 40,000 हून अधिक अमृत सरोवर बांधण्यात आले आहेत, जे एकूण उद्दिष्टाच्या 80% आहेत.

जन भागीदारी हा या मिशनचा मूळ गाभा असून त्यात सर्व स्तरावरील लोकांचा सहभाग आहे. प्रत्येक अमृत सरोवरसाठी आतापर्यंत 54088 वापरकर्ता गट तयार करण्यात आले आहेत. हे वापरकर्ता गट अमृत सरोवरच्या विकासाच्या संपूर्ण प्रक्रियेत जसे की व्यवहार्यता मूल्यमापन, अंमलबजावणी आणि त्याचा उपयोग यामध्ये पूर्णपणे सहभागी आहेत

सार्वजनिक आणि व्यावसायिक सामाजिक जबाबदारी संस्था देशभरातील अनेक अमृत सरोवरांच्या बांधकाम/ पुनर्जीवनात योगदान देऊन महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.

अमृत ​​सरोवर मिशनचे उद्दिष्ट अमृत सरोवराची गुणात्मक अंमलबजावणी आणि स्थानिक सामुदायिक क्रियाकलापांचे केंद्र म्हणून विकास करणे आणि अमृत सरोवर कार्यासाठी विविध मंत्रालयांशी एकत्रितरित्या काम करणे हे देखील आहे.

***

S.Tupe/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1912558) Visitor Counter : 98